PM Modi Criticize Congress at Gadchiroli Rally: पंतप्रधान मोदींनी गडचिरोलीतील चिमुर येथील सभेतून त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू आहे, असे मोदी म्हणाले. तर
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने १९८४ची जाहिरात जारी करून आरक्षणाच्या कोट्याच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मी महाराष्ट्र भाजपचेही अभिनंदन करेन, ज्यांनी अतिशय उत्कृष्ट संकल्प पत्र जारी केले आहे. या संकल्प पत्रात मुली-भगिनींसाठी, आपल्या शेतकरी बंधू-भगिनींसाठी, युवाशक्तीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक अप्रतिम संकल्प घेण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, महायुतीसोबतच केंद्रातील एनडीए सरकार म्हणजे महाराष्ट्रात दुहेरी इंजिनचे सरकार, म्हणजेच विकासाचा दुप्पट वेग. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मविआवर देखील टीकास्त्र सोडले. ‘महाराष्ट्राचा झपाट्याने विकास करणे हे आघाडीच्या सत्तेत नाही. आघाडीच्या लोकांनी विकासाला ब्रेक लावण्यातच पीएचडी केली आहे. कामं रखडवण्यात, लटकवण्यात आणि ते भटकवण्यात काँग्रेसवाल्यांची डबल पीएचडी आहे.
मविआने उद्धव ठाकरेंना आताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावे, इंडिया आघाडीतील घटक पक्षाची मोठी मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे कलम ३७० ही काँग्रेसचेचे देणे असल्याची टीकाही केली. ते म्हणाले, आमचे जम्मू-काश्मीर अनेक दशकांपासून फुटीरतावाद आणि दहशतवादाने जळत राहिले. जम्मू-काश्मीरच्या मातीवर मातृभूमीचे रक्षण करताना महाराष्ट्राचे अनेक शूर जवान शहीद झाले. ज्या कायद्यानुसार हे सर्व घडले ते कलम ३७० होते. हे कलम ३७० हे काँग्रेसचेच देणे होते. तर ‘आपल्या चंद्रपूरच्या या भागानेही अनेक दशकांपासून नक्षलवादाच्या आगीचा सामना केला आहे. येथे नक्षलवादाच्या दुष्टचक्रामुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. हिंसाचाराचा रक्तरंजित खेळ चालूच राहिला’ असेही मोदींनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींनी आदिवासी आरक्षणावरुनही काँग्रेसच्या धोरणावर टीका केली. ‘आज तुम्हाला काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या एका मोठ्या षडयंत्राबद्दल सतर्क करत आहे. आपल्या देशात आदिवासी समाजाची लोकसंख्या १० टक्के आहे. काँग्रेसला आता आदिवासी समाजाला जातींमध्ये विभागून कमकुवत करायचे आहे. आमच्या आदिवासी बांधवांची एसटी म्हणून असलेली ओळख नष्ट व्हावी, त्यांनी त्यांच्या ताकदीने निर्माण केलेली ओळख मोडीत काढावी आणि तुमची एकजूट तुटावी, हा काँग्रेसचा धोकादायक खेळ आहे.’ असेही मोदी म्हणाले.