दुश्मनी जम कर करो लेकिन…, ‘थोरात-विखे’ वादावर बाळासाहेब थोरात यांचा चिमटा, काय म्हणाले?
‘मतमतांतरे समजू शकतो. मात्र, बोलण्याच्या मर्यादाही सांभाळल्या पाहिजेत. आमच्या ‘मित्रा’कडून तसे घडत नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यावर चचर्चा करतो आहे,’ असा चिमटा विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी ‘थोरात-विखे’ वादावर काढला. थोरात-विखे वादावर मी काही बोलण्यापेक्षा त्रयस्थ व्यक्तींनी याकडे पाहावे आणि कोण योग्य व अयोग्य, हे ठरवावे, असे सांगून ‘दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों,’ असा सल्ला त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांचे नाव न घेता दिला.