• Mon. Nov 25th, 2024
    वॉर्डरोबमध्ये आता गुलाबी रंग आहे का? क्षणाचाही विलंब न लावता सुप्रिया सुळे म्हणाल्या…

    Supriya Sule: गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये सातत्यानं दिसत आहेत. त्यांच्या पिंक कॅम्पेनची चर्चा सध्या राज्यात आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जनसन्मान यात्रा काढली होती. त्या यात्रेची बसदेखील गुलाबी होती. अजित पवारांच्या पक्षाच्या कार्यक्रमातही गुलाबी रंगाचा वापर वाढला आहे. अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेनची सध्या राज्यात चर्चा आहे. त्या निमित्तानं त्यांची बहीण आणि खासदार सुप्रिया सुळेंना गुलाबी रंगाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला सुळेंनी अतिशय मोकळेपणानं उत्तर दिलं.

    अजित पवार सध्या गुलाबी जॅकेटमध्येच वावरताना दिसतात. त्यांच्या कार्यक्रमांमध्येही गुलाबी रंगाचा वापर कटाक्षानं होत असतो. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अपील व्हावं, या योजनेचा अधिकाधिक प्रचार व्हावा यासाठी अजित पवार गुलाबी जॅकेट परिधान करतात. याबद्दल सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्या महाराष्ट्र टाईम्सच्या मटा कट्टामध्ये सहभागी झाल्या होत्या.
    Uddhav Thackeray: काय झाडी, काय डोंगुर! कोणाची रेल्वेत ओळख आहे का? ठाकरेंकडून शहाजीबापूंची भन्नाट मिमिक्री
    तुमच्या वॉर्डरोबमध्ये आता गुलाबी रंग आहे का, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर कोणत्याही रंगावर कोणाचीच मक्तेदारी नाही. संविधानानं सगळीच मक्तेदारी मोडून काढलेली आहे, असं उत्तर सुळेंनी दिलं. ‘कोणताच रंग कोणाचाच नाही. ना केशरी, ना पिवळा, हिरवा, ना गुलाबी,’ असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
    कोल्हापुरात नवी घडामोड; उमेदवारी अर्ज माघार नाट्यानंतर छत्रपती कुटुंबाचा महत्त्वाचा निर्णय
    ‘तुम्हाला गंमत सांगते, माझ्या मुलाचं सध्याचं आवडतं गाणं गुलाबी साडी आहे. माझा मुलगा जसा दिसतो आणि त्याचा गाण्याची आवड यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्याला आनंद शिंदे माहीत आहेत. तो मुंबईत शिकला असला तरीही त्याच्याकडे पवार कुटुंबातलं काहीतरी आलंय,’ अशा शब्दांत सुळेंनी कौटुंबिक आयुष्यातील खास गोष्टी शेअर केल्या.

    Supriya Sule: वॉर्डरोबमध्ये आता गुलाबी रंग आहे का? क्षणाचाही विलंब न लावता सुप्रिया सुळे म्हणाल्या…

    दादांचा गुलाबी झेंडा अन् चिमुकली सोबतचा फोटो
    बारामतीत उमेदवारी अर्ज दाखल करताना सुप्रिया सुळेंसोबत एक भन्नाट किस्सा घडला होता. अजित पवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. त्यात सहभागी होण्यासाठी एक चिमुरडी आली होती. सुप्रिया सुळेंना पाहताच ती फोटो काढण्यासाठी धावली. तेव्हा तिच्या हातात दादांच्या पक्षाचा गुलाबी झेंडा होता. त्यावर घड्याळ चिन्ह होतं. सुळेंनी चिमुरडीला धावत जवळ येणाऱ्या चिमुकलीला जवळ घेतलं. तिच्या हातातला झेंडा पटकन शेजारच्या व्यक्तीच्या हातात दिला आणि मग त्या चिमुकलीसोबत फोटो काढला. अवघ्या काही सेकंदांमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम घडला होता.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed