• Thu. Nov 14th, 2024
    नांदेड उत्तरमधील मविआचा उमेदवार नेमका कोण? उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर आघाडीत संभ्रम

    Nanded North Vidhan Sabha Candidates: विधानसभा निवडणूकीचा प्रचाराचा धुरळा उडाला असताना आता नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारावरून महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. जागावाटपाच्या वाटाघाटीत ही जागा काँग्रेसला सुटली असताना

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड : विधानसभा निवडणूकीचा प्रचाराचा धुरळा उडाला असताना आता नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारावरून महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. जागावाटपाच्या वाटाघाटीत ही जागा काँग्रेसला सुटली आहे. असे असताना शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. ठाकरे गटाकडून संगीता डक यांना संधी देण्यात आली. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनीही हिंगोलीमधील वसमतच्या सभेत नांदेड उत्तरचे महाविकास आघाडीचे उमेदवार संगीता डक यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे येथील मविआचा उमेदवार नेमका कोण, यावरुन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबद्दल शरद पवार यांनी नांदेडमध्ये येऊन स्पष्टीकरणही दिले. महाविकास आघाडीचा उमेदवार काँग्रेसचे अब्दुल सत्तार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर आज उद्धव ठाकरे यांनी नांदेडला येऊन नांदेड उत्तरमधून संगीता पाटील डक यांच्या नावाची घोषणा केली. महाविकास आघाडीतील दोन बड्या नेत्यांच्या घोषणेने आघडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

    या स्थितीमुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते विभागले गेले असल्याचे चित्र मतदारसंघात निर्माण झाले आहे. नांदेड उत्तरची जागा काँग्रेसला सुटल्याने अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे संगीता पाटील डक यांनीही ठाकरे गटाकडून आपला स्वतंत्र प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत विविध चर्चा सुरु होत्या. त्यातच काल नांदेड दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनी काँग्रेसचे अब्दुल सत्तार हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे स्पष्टीकरण दिले. पण उद्धव ठाकरेंनीच खुद्द आज उमेदवार घोषित केल्यामुळे मतदारसंघात मविआमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत.
    Vikroli Silver Bricks: निवडणुकीपूर्वी मुंबईत खळबळ, कॅश व्हॅनमध्ये ‘साडेसहा’ टन चांदीच्या विटा, किंमत तब्बल…
    दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज परभणी दौरा आटोपून नांदेड येथील सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांच्या कार्यालयाला भेट दिली आणि नांदेड उत्तरचा उमेदवार शिवसेनेच्या संगीता पाटील डक असल्याची घोषणा केली. नांदेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध करण्याची संधी आली आहे, याचं सोनं करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ज्या मतदारसंघात गद्दार उभे आहेत, त्यांना पाडा आणि आपल्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन देखील ठाकरे यांनी केले. यामुळे मतदार देखील संभ्रमात पडणार, हे निश्चित.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed