रत्नागिरी : भाजपाच्या यादीत सुद्धा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे नाव नाही. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढला आहे. अशातच किरण सामंतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीला बोलावल्याचे वृत्त आहे. या सगळ्या बाबत सस्पेन्स कायम असतानाच आता मंत्री दीपक केसरकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. जर किरण सामंत यांना तिकीट जरी मिळालं नाही, तरी ते जो उमेदवार असेल त्याचं निष्ठावानपणे काम करतील असं मोठे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. किरण सामंत हे उगवतं नेतृत्व आहे. त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं तर आनंद आहे, पण नाही मिळालं तरी ते विधानसभा कुठेही रत्नागिरी जिल्ह्यात आमच्या वाट्याच्या मतदार संघात निवडून येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.
किरण सामंत हे विधानसभा मतदार संघात कुठल्याही मतदार संघातून निवडून येऊ शकतात. किरण सामंत हे तरुण आणि उगवतं नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांना जर लोकसभेची सीट मिळाली तर ते खूप जोमाने काम करू शकतील. परंतु त्यांना सीट मिळणार की नाही? हे मी आता सांगू शकत नाही.
पण त्यांना तिकीट मिळावं अशी आम्ही मागणी आणि प्रार्थना करतो. त्यांना तिकीट जरी मिळाले नाही, तरी ते जो उमेदवार असेल त्याचं निष्ठावानपणे काम करतील. तसेच त्यांना जर उमेदवारी मिळाली नाही, तर ते तरुण असल्यामुळे त्यांना चांगलं भवितव्य आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या ज्या काही चांगल्या जागा शिवसेनेच्या वाट्याला रत्नागिरी जिल्ह्यातून येतील तेथे एखाद्या विधानसभा जागेवर ते जोमाने लढतील आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. दुसरी गोष्ट त्यांना खासदारकीच जरी तिकीट मिळालं तर ते मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतील. त्यामुळे तरुण आणि उगवतं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत आहोत. त्यामुळे शिवसेनेचे उगवते नेतृत्व उदयाला येईल याची मला खात्री असल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.