म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या तीव्रतेबरोबरच सर्दी-तापाचे रुग्णदेखील वाढू लागले आहेत. पालिकेच्या ४१ आरोग्य केंद्रांमधून रोज सरासरी एक हजार रुग्णांची तपासणी होत आहे. उष्माघाताचा गंभीर रुग्ण अद्याप आढळला नसला, तरी उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आल्याचे चित्र आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे सर्दी – ताप-खोकल्याचे रुग्णदेखील वाढले आहेत. उष्माघाताचे गंभीर रुग्ण आढळून आलेले नसले तरी सर्दी-तापाचे सरासरी एक हजार रुग्ण पालिकेच्या ४१ आरोग्य केंद्र आणि रुग्णालयातून रोज उपचार घेत आहेत. डॉ. पारस मंडलेचा यांनी ही माहिती दिली आहे. वाढत्या उन्हामुळे थकवा जाणवणे, भुक कमी लागणे, डोके दुखणे असे त्रास जाणवतात. नागरिकांनी वेळीच औषधोपचार करुन घेतल्यास त्याचा या त्रासातून बचाव होऊ शकतो.
नागरिकांनी उन्हात जास्त वेळ उभे राहू नये, उन्हात जाताना डोक्याला रुमाल बांधावा किंवा टोपी घालावी.
नागरिकांनी उन्हात जास्त वेळ उभे राहू नये, उन्हात जाताना डोक्याला रुमाल बांधावा किंवा टोपी घालावी.
– डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य अधिकारी, महापालिका