• Sun. Nov 24th, 2024
    ‘नीट’ परीक्षेच्या नोंदणीची मुदत आज संपणार; अर्ज भरण्याची अखेरची संधी, ‘या’ दिवशी होणार परीक्षा

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टच्या (नीट) नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना दोन दिवसांची विशेष मुदत देण्यात आली होती. ही मुदत आज (दि. १०) संपत असून, विद्यार्थ्यांना १० वाजून ५० मिनिटांपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तसेच ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत फी भरून अर्ज निश्चिती करता येणार आहे.‘नीट’च्या गुणांआधारे देशभरातील आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. ‘एनटीए’मार्फत यंदा ५ मे ला देशभरात ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना ९ फेब्रुवारी ते ९ मार्चदरम्यान मुदत देण्यात आली होती. त्यानंतर मुदतवाढ देऊन नोंदणीसाठी १६ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. या कालावधीत देशभरातून २३ लाख ८१ हजार ८३३ विद्यार्थ्यांनी ‘नीट’साठी अर्ज दाखल केले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ३ लाख अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतरही अनेक विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले असून, या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ‘एनटीए’कडे केली होती.
    १९ एप्रिलला मतदान; पश्चिम बंगालमध्ये १० उमेदवार करोडपती, तर ‘हे’ आहेत सर्वांत गरीब उमेदवार
    त्यानुसार विशेष सुविधा म्हणून ९ व १० एप्रिल हे दोन दिवस ‘नीट’साठी अर्ज करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले होते. त्यानुसार आजअखेर विद्यार्थ्यांना हे अर्ज दाखल करता येणार आहेत. यानंतर ‘नीट’साठी अर्ज करण्यास कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे ‘एनटीए’मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात दरवर्षी ‘नीट’साठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या तुलनेत देशातील आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये मात्र फारशी वाढ झालेली नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *