• Sat. Sep 21st, 2024
जनावरांचे अंत्यसंस्कार शवदाहिनीत; दुर्गंधीला आळा, मार्च महिन्यात ८५७ प्राण्यांवर अंत्यसंस्कार

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेने शहरातील मृत जनावरांसह प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी डिझेल शवदाहिनी उपलब्ध करून दिल्याने शहर परिसरातील दुर्गंधीला आळा बसला आहे. पशुसंवर्धन विभागाने घेतलेल्या या पुढाकारामुळे मार्च महिन्यात तब्बल ८५७ प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी ६८९ लिटर डिझेल लागले, अशी माहिती यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी दिली.शहरात भटक्या जनावरांचा तसेच प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. विशेषत: बाजारपेठा आणि गावठाण भागात मोकाट जनावरांची संख्या सर्वाधिक आहे. शहरातील जुने नाशिक, सारडा सर्कल, पंचवटी या भागात मोकाट कुत्रे आणि जनावरांची संख्या अधिक असून, ते वाहतुकीलाही अडथळा ठरतात. शहर परिसरात अद्याप शेती होत असल्यामुळे या भागात जनावरांचा वावर आहे. शहर परिसरात असलेल्या गोठ्यामध्ये जनावरे मृत झाल्यानंतर खासगी मालक त्यांच्या पद्धतीने जनावरांची विल्हेवाट लावतात.

उच्च तापमानामुळे उष्णतेशी संबंधित आजार; डोळ्यांच्या समस्यांत वाढ, अशी घ्याल डोळ्यांची काळजी
परंतु, बहुतांश जनावरे किंवा प्राणी हे रस्त्यावर मरून पडत असल्याने त्यातून दुर्गंधी निर्माण होते. परिणामी रोगराईला सामोरे जावे लागत होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मृत जनावरांवर विल्हेवाट लावण्याची सोय उपलब्ध नव्हती. परंतु, मागील वर्षात मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची सोय विल्होळी येथील खत प्रकल्पाच्या आवारात करण्यात आली. आरोग्य विभागाच्या वतीने मृत जनावरांची वाहतूक करण्यासाठी लिफ्ट व्हॅन देखील उपलब्ध करून देण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून रस्त्यावर अस्ताव्यस्त पडणाऱ्या तसेच खासगी गोठ्यांमध्ये मृत झालेल्या जनावरांवर अंत्यविधी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. मार्च महिन्यात डिझेल शवदाहिनीवर ८५७ मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यात आली.

मार्चमधील मृत प्राणी

श्‍वान- ४१४

मांजर- ८६

वासरे- २५४

गायी- ६३

डुक्कर – ३०

बैल-१

म्हैस- ५

घोडे- २

शेळी- २

एकूण ८५७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed