• Mon. Nov 25th, 2024
    विशाल पाटील म्हणाले, सांगलीचा निर्णय उद्या, आम्ही टेन्शन घेत नाही..! नेमका अर्थ काय?

    स्वप्निल एरंडोलकर, सांगली : “सध्या जोरदार राजकीय गडबड सुरु आहे. या गडबडीत सुद्धा आम्हाला या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला यायचा योग जुळून आला. येता येईल की नाही याचे टेन्शन होते. पण आम्ही आज राजकीय सुट्टी घेतली. उद्या काहीतरी निर्णय होईल, आम्ही टेन्शन घेत नाही”, असे सूचक विधान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सांगली लोकसभेचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी केले. दुसरीकडे सांगली लोकसभेच्या जागेचा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेला तिढा अद्याप सुटलेला नसल्याने विशाल पाटील यांच्या ‘उद्या निर्णय होणार’ या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

    सांगलीतील पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने रमजान महिन्यानिमित्त ‘दावत ए इफ्तार पार्टी’चे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मात्र, विशाल पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी संवाद टाळल्याने सांगलीच उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे.
    आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांची पाठ

    शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आघाडीमधील सर्व वाद मिटले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसचे नेते विशाल पाटील विश्वजीत कदम यांच्यासह सर्वच घटक पक्ष लवकरच चंद्रहार पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रचारात आघाडी घेतील, चिंता नसावी, असे विधान केले होते. त्यानंतर रविवारी रात्री झालेल्या कार्यक्रमात उद्या निर्णय होणार, आम्ही टेन्शन घेत नाही, असे विधान विशाल पाटील यांनी केल्याने नेमका काय निर्णय होणार? कोण माघार घेणार? कोण कुणाचा प्रचार करणार? असे प्रश्न सांगलीत विचारले जात आहेत.
    सांगलीचा फायनल तोडगा काढण्यासाठी खासगी विमानाने विश्वजित कदम-विशाल पाटील दिल्लीत, सेना माघार घेणार?

    सोमवारी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये विशाल पाटील आणि आमदार विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. उद्या स्थानिक काँग्रेस नेते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

    विशाल पाटलांच्या पायलटशी चर्चा करु, ट्रेनिंग देऊ; सांगलीच्या तिढ्यावर राऊतांचं वक्तव्य

    सध्या रमजान महिना सुरु आहे. अनेक मुस्लिम बांधव रमजानचा उपवास धरत असतात. अशातच लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. सांगलीतील बदाम चौक येथील गुलकंद ग्राउंड येथे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष संजय बजाज यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शेजारी शेजारी बसलेले राष्ट्रवादीचे नेते आणि विशाल पाटील यांनी एकमेकांशी संवाद साधण्याचे टाळले, त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *