• Mon. Nov 25th, 2024
    पुण्यात उच्चशिक्षित दाम्पत्यांमध्ये वाद; पोलिसांनी पती,पत्नीचे समुपदेशन करून टिकवले नाते

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : उच्चशिक्षित आणि मोठ्या पगाराची नोकरी असलेल्या तरुणीला लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीकडून त्रास सुरू झाला. ‘पगारातील पैसे आई-वडिलांना द्यायचे नाहीत,’ असे सांगून पतीने तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण केली. वैतागलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतल्यावर पोलिसांना तिच्या पतीला ठाण्यात बोलावून घेतले. तेथे दोघांचेही समुपदेशन करून नात्याला आणखी एक संधी देण्याचे सुचवले. दरम्यान, त्याच दिवशी तरुणीच्या पतीचा वाढदिवस असल्याचे कळताच पोलिसांनी केक आणून पोलिस ठाण्यातच वाढदिवस साजरा करीत भांडणाचा शेवट गोड केला.सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात चार एप्रिलला हा प्रकार घडला. या घटनेतील या नवदाम्पत्याचा विवाह नोव्हेंबर २०२३ मध्ये झाला होता. तरुणी लग्नापूर्वी खासगी कंपनीत नोकरी करीत होती. तेथे तिला ७० हजार रुपये वेतन आहे. तिचा पती औंध परिसरातील रुग्णालयात नोकरी करतो. त्याला पत्नीपेक्षाही कमी पगार आहे. तिच्या आई-वडिलांवर असलेल्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी ती लग्न होण्यापूर्वीपासून आई-वडिलांना दरमहा काही रक्कम देत होती. लग्नानंतरही तिने पैसे देणे थांबविले नाही.

    कोकणचा राजा सर्वसामान्यांच्या आवाक्यात, किरकोळ बाजारात आंबा आठशे ते हजार रुपयांवर
    लग्नानंतरही मुलीने आई-वडिलांचा सांभाळ करणे, त्यांना उदरनिर्वाहासाठी किंवा काही गरजेसाठी पैशांची मदत करणे चुकीचे नाही. उच्चशिक्षित दाम्पत्याने अशा विषयांवर वाद घालणे चुकीचे आहे. दोघांनाही त्यांच्या चुका लक्षात आणून देऊन त्यांना पुन्हा नव्याने संसार करण्यास सांगितले. दोघांनाही एकमेकांना त्यांच्या आई-वडिलांपासून दूर ठेवण्याचा अधिकार नाही. पत्नीला मारहाण केल्यास पतीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची जाणीव करून दिली.

    – विजय कुंभार, वरिष्ठ निरीक्षक, सिंहगड रस्ता पोलिस ठाणे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed