• Thu. Jul 30th, 2026
    Video: आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

    बीड : बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा स्वीय सहायक महादू सोळंके यांना भर चौकात मारहाण केली असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या महादू सोळंके यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.माजलगाव शहरांतील रंगोली कॉर्नरवर काल दुपारी ही मारहाण करण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले अरूण राऊत यांचे पुतणे अजयसिंह राऊत यांनी ही मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

    ज्यांच्या विरोधात उतरणार होते, आता त्यांच्यासाठीच मैदानात; शिवतारे सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार

    ‘मराठा आंदोलन दरम्यान जाळपोळीच्या घटनेत माझे नाव या जाळपोळीत विनाकारण का गोवले? माझ्यावर गुन्हा दाखल करतो का? मी जाळपोळीत होतो तरी का?’ असे म्हणत सलूनमध्ये दाढी करताना बेदम मारहाण केली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाल्याचे पाहायला मिळालं नाही. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    Nagpur News: पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून वाद -प्रतिवाद;महापालिकेचा हजार घरांचा अंदाज,तर पाच हजार घरे बाधित झाल्याचा नगरसेवकांचा दावा
    Satara Koyna Dam : ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’! साताऱ्यातील धरणाच्या जलाशयाला मिळाली नवी ओळख; सरकारचा मोठा निर्णय
    Sangli Crime : महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दुचाकी चार्जिंग करण्यास विरोध, वॉचमनच्या मुलाच्या डोक्यात सणक गेली; ऑनड्युटी ऑपरेटरला संपवलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed