• Mon. Nov 25th, 2024

    सुनेची कुटुंबावरुन शिवीगाळ, पतीसह सासऱ्याचा पारा चढला, धक्कादायक कृत्यानं धुळ्यात खळबळ

    सुनेची कुटुंबावरुन शिवीगाळ, पतीसह सासऱ्याचा पारा चढला, धक्कादायक कृत्यानं धुळ्यात खळबळ

    धुळे: सतत होणारा वाद विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात सासऱ्याने मुलाच्या मदतीने सुनेचा गळा आवळत खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे. भारतीबाई गजेंद्र भिल असं मृत महिलेचे नाव आहे. तर विजय मोतीसिंग भिल (५७) गजेंद्र भिल (२५) असं आरोपी पितापुत्राचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
    नाशिककरांसाठी मोठी बातमी! ‘या’ आठ रस्त्यांवर दीड वर्ष वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
    मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील चांदसे येथे सासरा विजय भिलसोबत मुलगा गजेंद्र भिल आणि सून भारतीबाई भिल आणि मुले हे एकत्र राहत होते. गेल्या काही दिवसांपासून सासरा आणि सून यांच्यात मजुरीच्या पैशावरुन सतत भांडण होत होते. त्यांच्यातील वाद अनेकदा विकोपाला जात होता. अशातच सुनेने सासऱ्यासोबत पुन्हा नव्यावे वाद घातला. या वादानंतर सासरा विजय भिल आणि त्याचा मुलगा गजेंद्र भिल यांनी भारतीबाई भिलचा दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
    याप्रकरणी मयत भारतीबाई भिल हिच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार, माझ्या मुलीने मला याआधी सांगितले होते की, माझा सासरा आणि नवरा मला दारू पिऊन मजुरीच्या पैशांवरून वारंवार त्रास देतात. मला जीवे मारण्याची धमकी ही देतात असे मयत भारतीबाई भिल हिने तिच्या आईला सांगितले होते. मात्र आई हिने तू कोणाशी वाद घालू नको, असे समजावून सांगितले होते. मात्र त्यानंतर देखील या तिघांमधील वाद इतका विकोपाला गेला की भारतीबाई भिल हिने विजय भिल यांना त्यांच्या खांदानावरून शिवीगाळ केल्यामुळे पती गजेंद्र भिल आणि सासरा विजय भिल यांनी तिचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना घडली.

    शेतकऱ्यांचा मोदी सरकारवर विश्वास, भारती पवारांनी कामाचा लेखाजोखा मांडला

    दरम्यान सुनेचा मृत्यू झाल्याचे लक्षात येतात सासरा विजय भिल याने शिरपूर शहर पोलीस स्टेशन गाठले. पोलिस अधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली खुनाच्या घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील हे इतर अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी घेऊन लागलीच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर भारतीबाई भिल हिच्या पतीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली. या प्रकरणी संशयित सासरा विजय भिल आणि पती गजेंद्र भिल यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्ह दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी यावेळी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *