• Sat. Sep 21st, 2024
ईव्हीएमवर संशय घेणारं स्टेटस, सरकारी कर्मचाऱ्याचं थेट निलंबन, गुन्हाही दाखल

रवी राऊत, यवतमाळ : देशभरात निवडणुकीचं वातावरण आहे. ईव्हीमवर घेण्यात येणाऱ्या या निवडणुकीला काही राजकीय पक्ष विरोध करत असल्याचं दिसतं. निवडणूक ईव्हीएम ऐवजी मतपत्रीकेद्वारे घेण्याची मागणी सातत्याने होत असते. राजकीय पक्षांचा ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याचा आरोप आहे. हाच संशय व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे व्यक्त करणं एका सरकारी कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे वन्यजिव विभागात लिपीक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या व्हॉटसॲपवर ईव्हीएमवर संशय निर्माण करणारं “ये सच्चाई है” असं स्टेटस ठेवल्याने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
परभणीतून अर्ज भरणाऱ्या ‘फकीर’ महादेव जानकर यांची संपत्ती किती? शपथपत्रांमधून माहिती समोर
काय आहे प्रकरण?
शिवशंकर प्रभू मोरे हे चंद्रपूर-आर्णि लोकसभा मतदार संघातील पांढरकवडा येथे वन्यजीव विभागात लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ईव्हीएमवर संशय निर्माण करणारं “ये सच्चाई है” असं स्टेटस ठेवल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोगाने निलंबणाची कारवाई केली आहे.

नियमानुसार, निवडणूक आचारसंहितेच्या काळात कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याने कोणतीही राजकीय भूमिका घेणं, राजकीय पक्षाला पाठिंबा देणं कायद्याने गैर आहे. हाच नियम शिवशंकर मोरे यांनी पाळला नसून त्यांनी ईव्हीएम बाबतीत समाजामध्ये संशय निर्माण केल्याचा, खोटा प्रचार केल्याचा आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप करत शिवशंकर मोरे यांच्यावर कर्मचारी लोकप्रतिनीधी कायद्याअन्वये निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ही निलंबनाची कारवाई आली आहे.
दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवारांची साथ सोडणारा मी नाही, रोहित पवारांची तटकरेंवर सडकून टीका
आर्णी येथील सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याने विभागीय वनअधिकारी वन्यजीव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, की मोरे यांच्याविरुद्ध तक्रार आली. त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांनी स्टेटसद्वारे ईव्हीएमच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण केला आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला, असं या तक्रारीत नमूद आहे. सरकारी कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारचं वर्तन अपेक्षित नाही आणि हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असंही पत्रात नमूद आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून गुन्हा दाखल करण्यात आल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे.
खोटं प्रसिद्ध करून माझं चारित्र्यहनन करण्याचा भाजप प्रयत्न करेल, प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल
इतर कर्मच्याऱ्यांची करायचा तक्रार
शिवशंकर मोरे हे वाशिम वन विभागात कार्यरत असताना आपल्या सहकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांच्या नावाने माहिती अधिकारचे अर्ज टाकून विनाकारण त्यांना त्रास देण्याचं काम करण्याचे. त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती इतर लोकांना पुरवून आपल्याच सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करत होते. आत मात्र त्यांचंच निलंबन झालं आहे.

कन्फर्म ‘तिकीट’ अन् हवीहवीशी ‘सीट’, भावना गवळी यांचा मोदींनी उद्घाटन केलेल्या ट्रेनने प्रवास

या कायद्याअंतर्गत कारवाई
माहिती तंत्रज्ञान कायदा २००० आणि लोकप्रतिनिधीत्व अधिनियमन १९५१ आणि भारतीय दंड विधान १७१ (ग) नुसार निवडणूक काळात खोटं विधान असत्य लिखाण करुन निवडणूक व्यवस्थेत संशय निर्माण केल्याने आणि सरकारी सेवेतील शिस्तीचा भंग केल्यामुळे शिवशंकर मोरे यांना नियम १९७१ (५) चं उल्लंघन केल्याचा आरोप करत कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed