गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांची प्रचारसभा शुक्रवारी आरमोरीत झाली. यात बोलताना चेन्नीथला यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली. व्यासपीठावर काँग्रेस नेते मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार अभिजित वंजारी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, उमेदवार नामदेव किरसान यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते.
ईडी आणि सीबीआयच्या भीतीने अशोक चव्हाण, अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह राज्यातील काही बडे नेते महायुतीमध्ये भाजपसोबत गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती आहे. अशा नेत्यांची मोठी यादी माझ्याकडे आहे.-विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणलेले आर्थिक धोरण मोदी सरकार बदलत आहे. जल-जंगल-जमीनवर हे सरकार घाला घालत आहे. खासगीकरण करून आरक्षण संपवित बेरोजगार तरुणांवर अन्याय केला जात आहे.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस