मध्य रेल्वे
स्थानक – माटुंगा ते मुलुंड
मार्ग – अप-डाउन धीमा
वेळ – स. ११.०५ ते दु. ३.५५
परिणाम – ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवणार. यामुळे काही फेऱ्या रद्द, तर काही विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
स्थानक – ठाणे ते वाशी/नेरूळ
मार्ग – अप आणि डाउन वेळ – स. ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम – ब्लॉक वेळेत ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी /नेरूळ आणि ठाणे ते नेरूळ-पनवेल अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द.
पश्चिम रेल्वे
स्थानक – माहीम ते अंधेरी
मार्ग – अप आणि डाउन वेळ – सकाळी ११ ते दुपारी ४
परिणाम – ब्लॉक वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- वांद्रे-सीएसएमटी, सीएसएमटी-गोरेगाव-सीएसएमटी मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. काही चर्चगेट ते गोरेगाव फेऱ्या ही रद्द राहणार आहेत.
सहा दिवस रात्रकालीन ब्लॉक
मुंबई : घाटकोपर ते भांडुपदरम्यान विक्रोळी उड्डाणपूल गर्डर उभारण्यासाठी मध्य रेल्वेने सहा दिवसांचा रात्रकालीन विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी ६ एप्रिल मध्यरात्री ते गुरु. ११ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत ब्लॉक आहे. शनि. मध्यरात्री १.२० ते पहाटे ४.०५ पर्यंत, तर उर्वरित पाच दिवस मध्यरात्री तीन तास ब्लॉक असेल. रात्री उशिराच्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.