• Sat. Sep 21st, 2024
दिंडोरीत मविआमध्ये बिघाडी होणार? बड्या नेत्याची निवडणुकीची तयारी, पवारांना धक्का

शुभम बोडके (दिंडोरी नाशिक) : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केला आहे. मात्र आता माकपही दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे असून शरद पवार गटाला मोठा फटका बसू शकतो.

लोकसभा निवडणुकांचे रण तापले असून राज्यासह जिल्ह्यातही राजकीय वातावरण तापू लागले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासह दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना भाजपने पुनश्च एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे दिंडोरी लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाली असून तेथे राष्ट्रवादीने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे.
नाशिकमध्ये महायुतीची उमेदवारी देण्यात पिछाडी, ‘नवरदेवा’विना युतीचे वऱ्हाड संभ्रमात

मात्र या मतदारसंघावर माकपनेही दावा ठोकला असून माकपतर्फे माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चिंता वाढली असून याचा फायदा भाजप उमेदवार व विद्यमान खासदार भारती पवार यांना होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. माकपणे जर स्वतंत्र उमेदवार दिला तर महाविकास आघाडी पुढे मोठे आव्हान उभे राहू शकते.
राजकारण: दिंडोरी ठरणार का परिवर्तनाचे केंद्र? केंद्रीय मंत्री विरुद्ध सामान्य शिक्षक लढत?

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.भारती पवार यांना भाजपने उमेदवारी जाहीर केले आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांचे आव्हान आहे तर माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित हेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. दिंडोरी लोकसभेची जागा माकपला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. राज्यातील कम्युनिस्ट मते महाविकास आघाडीला हवी असतील तर माकपसाठी दिंडोरीची जागा हवी असाही दावा केला जात होता.

दिंडोरीचा ‘हेडमास्तर’ कोण होणार? उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भगरे गुरूजींची पहिली प्रतिक्रिया

मात्र भगरे यांच्या उमेदवारीनंतर आता माकपचा महाविकास आघाडी सोबत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे आता माकपणे माजी आमदार जीवा पांडू गावीत यांना उतरवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. माकपच्या एन्ट्रीमुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलतात का?केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉ.भारती पवार या पुन्हा दिल्लीत धडकणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed