• Sun. Mar 15th, 2026

    ‘स्वीप’ अंतर्गत युवा मतदारांकरीता रिल्स, पोस्टर्स व मिम्स स्पर्धा; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे

    ByMH LIVE NEWS

    Apr 3, 2024
    ‘स्वीप’ अंतर्गत युवा मतदारांकरीता रिल्स, पोस्टर्स व मिम्स स्पर्धा; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे

    चंद्रपूर, दि. 3 :  लोकसभा निवडणूक 2024 करीता 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे व नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘माय व्होट इज माय फ्युचर : पावर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स, पोस्टर्स मेकींग व मिम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

    लोकशाहीमध्ये मतदानाला अत्यंत महत्व आहे. देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी तसेच दिशा देण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी मतदान करायलाच हवे. याचाच एक भाग म्हणून स्वीप अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. 18 वर्षांवरील प्रथम मतदार मोठ्या संख्येने असल्याने व युवकांमध्ये रिल्स, पोस्टर व मिम्सचे विशेष आकर्षण असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

    या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांकरीता विशेष रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. रिल्स स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला प्रथम बक्षीस 15 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 10 हजार तर तृतीय बक्षीस 5 हजार रुपये दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे पोस्टर्स स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 5 हजार, द्वितीय 3 हजार तर तृतीय बक्षीस 2 हजार रुपये आहे. तसेच मिम्स स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार तर तृतीय बक्षीस 2 हजार रुपये देण्यात येणार आहे.

    मतदान करण्याबाबत जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविणे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी स्वतः बनविलेले रिल्स, पोस्टर्स व मिम्स् 12 एप्रिल 2024 पर्यंत अपलोड करून पाठवावे. सदर लिंक जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

    ०००००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed