आदित्य भवार, पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार मिळवत नाही म्हणून घर फोडून आई समान असलेल्या वहिनीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे, अशी बोचरी टीका बारामतीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी जर आईसारख्या असतील, तर आशीर्वाद द्या आणि निवडणुकीतून बाजूला व्हा, असं प्रत्युत्तर दिलं आहे.आज पुण्यामध्ये महायुतीची पुणे, शिरूर, बारामती लोकसभा मतदार संघातील महिला आघाडीची बैठक पार पडली. भाजपचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी या बैठकीला मार्गदर्शित केले. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी आयोजित केली होती.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि भाजपवर जोरदार टीका केली होती.

‘आईने केलेले संस्कार असतात त्याची जपणूक करण्याची संधी प्राप्त झाली आहे. मला असं वाटतं त्यांनी जर पाठिंबा दिला, तर निवडणूक क्लिअर होऊन जाईल. त्यांचं आईचं नात असेल तर खूप चांगलं आहे. थोड्या कारणास्तव दुरावली असली तरीही रक्ताची नाती एकत्र येत असतात. ही कायम अशीच राहोत. त्यामुळे त्यांनी आईला पाठिंबा द्यावा’, असं दीपक मानकर म्हणाले आहेत.