• Sat. Sep 21st, 2024
…मात्र इथे भाजपने सुरुंग लावला म्हणत शिंदे गटाच्या शिलेदारानं माढ्यात शड्डू ठोकला

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात अद्यापही संभ्रमाची परिस्थिती आहे. भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करताच विरोध सुरू झाला आहे. निंबाळकरांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख आणि लोकसभाचे पक्ष निरीक्षक संजय कोकाटे यांनी ताबडतोब राजीनामा देत भाजपला कडाडून विरोध केला. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत बबन दादा शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवली. यंदा त्यांच्यासोबत काम करत भाजपला निवडणुकीत काम करणं जमणार नाही, असे सांगत संजय कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजप विरोधात काम करणार, अशी भूमिका पंधरा दिवसांपूर्वी मांडली होती.
बुलढाण्यात महायुतीत बिघाडी; शिंदेंनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले, उमेदवारी अर्ज दाखलसंजय कोकाटे यांनी सोमवारी सकाळी भूमिका जाहीर करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत हजारो कार्यकर्त्यांना घेऊन जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. माढा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण या किल्ल्याला भाजपने सुरुंग लावला, संजय कोकाटे यांनी असेही स्पष्ट सांगितले. हा किल्ला राष्ट्रवादीसाठी मजबूत करणार आहे. शरद पवारांनी आजतागायत माढा लोकसभेसाठी उमेदवार दिला नसताना माढ्यातील मोठा नेता शरद पवारांच्या गळाला लागला आहे. एकीकडे मोहिते पाटलांचा विरोध आणि दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादीत मोठे नेते जात असल्याने भाजपला जबरदस्त फटका बसणार आहे.

महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव, तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत समन्वय समिती गठित केली पाहिजे : अनिल पाटील

शिवसेना शिंदे गटाचे माढा तालुक्याचे अध्यक्ष संजय कोकाटे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवत बबन दादा शिंदेना मोठा विरोध केला होता. जवळपास ७५ हजार विधानसभा निवडणुकीत मत प्राप्त केली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानंतर कमीतकमी ७० हजार मतदान आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. वंचितने देखील रमेश बारसकर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही. संजय कोकाटे यांनी पुढे बोलताना असेही म्हटलं की, माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली किंवा तुतारी माझ्या हातात दिली तर हसत हसत स्वीकारू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed