• Sat. Sep 21st, 2024
राम सातपुते यांना पाडण्यासाठीच सोलापूर लोकसभेची उमेदवारी, भाजपच्या नेत्याचा गंभीर आरोप

सोलापूर : सोलापूर शहरातील भाजपचे कार्यकर्ते दिलीप शिंदे यांनी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, दिल्ली दरबारी येथे जाऊन इच्छा व्यक्त केली होती. दिलीप शिंदेसह भाजपमधील जवळपास १९ स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केला होता. मात्र भाजपमधील काही नेत्यांनीच मोठं षडयंत्र रचलं असून प्रणिती शिंदेंच्या विजयासाठी पुन्हा एकदा बाहेरील उमेदवार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांचं सोलापुरात खच्चीकरण व्हावं आणि त्यांनी दिलेला उमेदवार निवडून येऊ नये म्हणून भाजपमधील काही नेत्यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते दिलीप शिंदे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन केला आहे.भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूर लोकसभासाठी राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. प्रणिती शिंदेनी तर बाहेरील उमेदवार भाजपने सोलापूरकरांवर लादला आहे. असं सांगत सोलापूर लोकसभा मतदारसंघात रान उठवलं आहे. राम सातपुते यांच्या जागी दिलीप शिंदेसह जवळपास १९ स्थानिक नेत्यांनी अर्ज केला होता. चुकीची माहिती देत, इच्छुक असलेल्या सर्वच स्थानिक नेत्यांना डावलून बीडचे व माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची भाजपने उमेदवारी दिली आहे. स्थानिक उमेदवार दिला नाही त्यामुळे भाजपमधील मोठा गट नाराज आहे. राम सातपुते यांच्या सभेला देखील उपस्थित राहत नाहीत. राम सातपुते यांच्यामुळे भाजपमध्ये मोठी नाराजगी पसरली आहे, अशी माहिती दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषद झाल्यानंतर माध्यमांना दिली आहे.
पालघरची स्ट्रॅटेजी ठाण्यात राबवणार? शिंदे-संजीव नाईकांच्या हस्तांदोलनाने ठाण्याचा तिढा सुटल्याची चर्चा

राम सातपुते हे भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत. मात्र भाजपमधील अंतर्गत नाराजगी आणि षडयंत्र हे सर्व भाजपमधील राष्ट्रीय नेत्यांना माहिती झाले तर, शेवटच्या क्षणी उमेदवारी बदलू शकते. उमेदवारी दिली म्हणजे एबी फॉर्म दिला असे नाही,असे अनेक उदाहरण आहेत. शेवटच्या क्षणी सोलापुरातील भाजपमधील षडयंत्र वरीष्ठ नेत्यांनी ओळखले तर, नक्कीच उमेदवार बदलला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed