• Sun. Nov 10th, 2024

    काढून टाकू ना! सातपुतेंचा कॉल, फडणवीसांचा शब्द, २५० तरुणांना दिलासा न् टाळ्यांचा कडकडाट

    काढून टाकू ना! सातपुतेंचा कॉल, फडणवीसांचा शब्द, २५० तरुणांना दिलासा न् टाळ्यांचा कडकडाट

    सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी शनिवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला होता. शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी राम सातपुते यांना भेटून मोची समाजाच्या व्यथा सांगितल्या. मोची समाजाच्या व्यथा ऐकून राम सातपुते यांनी थेट फडणवीसांना कॉल केला. राम सातपुते आणि देवेंद्र फडणवीस बोलतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोची समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेदेखील मोची समाजातून येतात.

    करोना काळात मोची समाजातील युवा नेता करण म्हेत्रे यांचा मृत्यू झाला होता. करण म्हेत्रे यांच्या अंत्य संस्काराला मोची समाजातील तरुण मुले, महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. करोना नियमावली पायदळी तुडवली, जाणूनबुजून शासकीय कामात अडथळा आणला या कलमानुसार सोलापूर शहर पोलिसांनी जवळपास अडीचशे लोकांवर भा.द.वि ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी घेऊन ज्योती वाघमारे सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार राम सातपुते यांकडे गेल्या होत्या.
    भाजपनं दबाव वाढवला, बालेकिल्ल्यात शिंदेंची कोंडी; ‘कल्याण’ करुन घेण्यासाठी रणनीती ठरली
    अन् राम सातपुते यांचा थेट फडणवीसांना कॉल
    मोची समाजातील अनेक तरुणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने कोर्टात हेलपाटे मारावे लागत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी हे सर्व प्रकरण राम सातपुते यांच्या समोर मांडले. करण म्हेत्रे यांच्या अंत्यविधींना उपस्थित राहिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. मोची समाजातील तरुणांवर लावण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा. त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची कैफियत मांडा असे सांगताच,राम सातपुते यांनी ताबडतोब फडणवीसांना कॉल केला आणि गुन्हा मागे घेण्याची विनंती केली. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब गुन्हा मागे घेऊ असे आश्वासन दिले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed