राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक जागा या शिवसेना उबाठा यांच्या खात्यात आल्या आहेत. शिवसेनेला १९ जागा मिळाल्या आहेत. जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, रायगड, मावळ, रत्नागिरी सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकणंगले, हिंगोली, शिर्डी, औरंगाबाद, यवतमाळ-वाशिम, धाराशीव या १९ जागांवर शिवसेना निवडणूक लढणार आहे.
तर काँग्रेसच्या खात्यात १६ जागा आल्या आहेत. नंदुरबार, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, मुंबई उत्तर मध्य, सोलापूर, नागपूर, पुणे, लातूर, जालना, अकोला, अमरावती, भंडारा-गोंदिया, कोल्हापूर, रामटेक येथून काँग्रेस निवडणूक लढणार आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात कमी ९ जागा मिळाल्या आहेत. शरद पवार गट बारामती, शिरुर, सातारा, अहमदनगर, रावेर, डिंडोरी, बीड, वर्धा येथून निवडणूक लढणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीला विदर्भात एक जागा हवी होती. तर शिवसेना उद्धव ठाकरे गट उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या जागेसाठी इच्छुक होता. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला विदर्भातील वर्धा तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जळगावची जागा सोडण्यात आली.
सध्या महाविकास आघाडीचं ४४ जागांचं गणित जुळून आलं आहे. पण, ४ जागांवरुन अद्यापही एकमत झालेलं दिसत नाहीये. सांगली, भिवंडी, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण मध्य या चार जागांवरुन अद्याप शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे.