• Sat. Sep 21st, 2024

प्रकाश आंबेडकरांचा मास्टर स्ट्रोक, वंचितच्या भूमिकेचे महाराष्ट्रातून जोरदार स्वागत; कोल्हापुरातून शाहू महाराजांचा विजय निश्चित

प्रकाश आंबेडकरांचा मास्टर स्ट्रोक, वंचितच्या भूमिकेचे महाराष्ट्रातून जोरदार स्वागत; कोल्हापुरातून शाहू महाराजांचा विजय निश्चित

मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयाचे महाराष्ट्रातून जोरदार स्वागत होत असून, ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे शाहू महाराजांचा विजय निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

वंचित बहुजन आघाडी शाहू महाराज छत्रपती यांना पूर्ण पाठिंबा देणार आहे. वंचित बहुजन आघाडी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवते आणि या विचारधारेचे प्रमुख समर्थन करते. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांबद्दल आमच्या मनात अपार आदर आहे. त्यामुळे आम्ही हा जाहीर पाठींबा त्यांना दिल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला अल्टिमेटम; २६ मार्चपर्यंत तिढा सुटला नाही तर…

शाहू महाराज यांनी मानले आभार

वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज यांना दिलेल्या पाठिंब्याचे शाहू महाराज यांनी X वर पोस्ट करत आभार मानले आहेत. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध जपले गेल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

सतेज पाटील म्हणाले….


मी प्रकाश आंबेडकर यांचे मनापासून आभार मानतो.आदरणीय श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांचे धन्यवाद . समतेचा विचार आणि संविधान टिकवण्यासाठी आपला पाठिंबा आम्हांला निश्चितच बळ देईल.तसेच राज्यात महाविकास आघाडीतही आपण सहभागी व्हावे, ही अपेक्षा, असे सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदे सांगितले.

संभाजीराजेंनी केले ट्विट

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचे सर्वजण स्वागत करत असताना संभाजीराजे छत्रपतींनी देखील शाहू महाराजांचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे. या ट्विटची देखील चर्चा संपूर्ण राज्यभरात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed