पुणे : महामेट्रोने धुलीवंदनाच्या दिवशी (२५ मार्च) सकाळी सहा ते दुपारी दोन दरम्यान मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मेट्रो सेवा बंद ठेवण्यामागील कारण महामेट्रोने स्पष्ट केलेलं नाही.महामेट्रोकडून वनाझ ते रामवडी आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हील कोर्ट मार्गावर मेट्रो सेवा दिली जाते. दिवसाला साधारण ८० हजार प्रवासी मेट्रोतून प्रवास करतात. सकाळी सहा ते रात्री दहा दरम्यान दोन्ही मार्गावर मेट्रो सेवा दिली जाते. धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी सहा ते दुपारी दोन दरम्यान मेट्रो सेवा बंद राहणार आहे. दुपारी दोन पासून नियमित सेवा सुरू केली जाईल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मेट्रोकडून करण्यात आले आहे.