• Sat. Sep 21st, 2024

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार ठरला? प्रणिती शिंदेंच्या विरोधात आक्रमक उमेदवार उभा करणार

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार ठरला? प्रणिती शिंदेंच्या विरोधात आक्रमक उमेदवार उभा करणार

सोलापूर: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी २ याद्या जाहीर केल्या आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेटी करत कॉर्नर बैठका घेत प्रचार सुरू केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदें विरोधात ही तसाच तगडा, त्या लेव्हलचा, आक्रमक बोलणारा उमेदवार भाजपकडून सोलापूर लोकसभेला मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते यांचे नाव राजकीय पातळीवर आघाडीवर आहे.आमर साबळे,शरद बनसोडे,दिलीप शिंदे,नारायण बनसोडे,संगीता जाधव यांच्याही नावांची चर्चा सुरू आहे.या सर्वांना बायपास करून राम सातपुते बाजी मारतील अशी चर्चा सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुरू आहे.

प्रणिती शिंदें समोर तगडे आवाहन राम सातपुतेच

माळशिरसचे विद्यमान भाजप आमदार राम सातपुते हे सुद्धा आक्रमक वक्तृत्व शैलीचे नेते आहेत. विधानसभेत प्रत्येक प्रश्न ते तळमळीने मांडतात. माळशिरसचे आमदार असतानाही त्यांनी सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल चा प्रश्न विधानसभा आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता. प्रणिती शिंदे या देखील सोलापूर शहर मध्यच्या मतदारसंघात मागील तीन टर्म आमदार आहेत. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. त्या थेट मतदारांच्या संपर्कात असतात. मतदारांचे प्रत्येक प्रश्न ते विधानसभेत मांडतात. महिला आणि युवकांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. महिला म्हणून ही त्या आक्रमक आहेत.भाजपकडून प्रणिती शिंदे यांना आव्हान देणारा त्याच ताकतीचा उमेदवार भाजपला द्यावा लागणार आहे.

नावातच राम असल्याने भाजपला फायदा

राम सातपुते हे मतदार संघात गावोगावी फिरून नागरिकांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न करत असतात. जरी ते इतर जिल्ह्यातले असले तरी मागील पाच वर्षात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आपली चांगले ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावात ‘राम’ असल्याने भाजपला हा मोठा फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास निश्चितच आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यातील लढत तितक्याच ताकतीची पाहायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed