• Thu. Nov 28th, 2024
    पतीचे विवाहबाह्य संबंध, पत्नीचा विरोध, सततच्या वादाला तरुण कंटाळला, घेतला टोकाचा निर्णय

    नवी मुंबई: भूम येथून पत्नीचा खून करून पळालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाणे आणि भुम पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करून पनवेल येथून अटक केली आहे. भूम पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी सुरज लहू तोडकर (२०) याने त्याची पत्नी पुर्णिमा (१८) हिचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने पेट्रोल टाकून तिचे पुर्ण शरीर जाळून टाकले होते. या गुन्ह्यातील आरोपी सूरज तोडकर आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा भूम पोलीस ठाण्यात दाखल केला होता.
    पुण्यात दुहेरी हत्याकांड; सततच्या वादाने पती कंटाळला, रागाच्या भरात पत्नीसह मुलीसोबत धक्कादायक कृत्य
    या गुन्ह्यातील आरोपी सूरज लहू तोरकड हा पनवेल बस स्टॅन्ड, अमरधाम परिसरामध्ये त्याच्या मोटरसायकलवरून येणार असल्याची माहिती भूम पोलीस ठाण्याचे सपोनि शशिकांत तवार, यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी अभयसिंह शिंदे यांना कळविली. ही माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना दिली असता त्यांनी पोलीस उपायुक्त परि-२. विवेक पानसरे, व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांना दिली. त्यांच्या मार्गदशनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणेकडी पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रशासन प्रवीण भगत, पोलीस उप निरीक्षक अभयसिंह शिंदे, पोहवा परेश म्हात्रे, पोशि प्रसाद घरत, पोशी साईनाथ मोकळ असे पथक तयार करण्यात आले.या गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपीची माहिती प्राप्त केली असता आरोपी हा चिपळे गाव येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे चिपळे गाव येथे येण्या-जाण्याच्या रस्त्यावर दोन पथक तयार करून आरोपीसाठी सापळा रचला. काही वेळात एक इसम दुचाकीवर एका महिलेसह येताना दिसला. तात्काळ सापळा रचून बसलेल्या पथकाने सदर संशयित मोटार सायकलचा पाठलाग करून इसमास ताब्यात घेतले असता हा गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

    भाजपचा सुपडा साफ करा, फडणवीसांवर घणाघात करत जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन

    अधिक तपासात त्याने त्याची पत्नी पूर्णिमाचा खून केल्याचे सांगितले. सूरजचे विवाहबाह्य संबंध होते. याला त्याचा पत्नीचा विरोध होता. यामुळेच त्याने तिची हत्या केल्याचे सांगितले. तसेच तिची ओळख न पटण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. हा गुन्हा केल्यानंतर सुरज स्वतःचे अस्तित्व लपवून पनवेल येथे जे.सी.बीवर चालक म्हणून काम करून पनवेल परीसरात राहत होता. अशी माहिती त्याने दिली आहे. या प्रकरणी आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सपोनि तवार, भूम पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई या पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय येनपूरे, अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, यांच्या सुचणे नुसार आणि पोलीस उपआयुक्त, विवेक पानसरे, सह पोलीस आयुक्त अशोक राजपूत याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed