• Mon. Nov 25th, 2024
    दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे मृतदेह सापडले; चिपळूण तालुक्यात खळबळ

    रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चिपळूण तालुक्यात दसपटी विभागात हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोनाली राजेंद्र निकम (वय-१४) आणि मधुरा लवेश जाधव (वय- १४ रा. कादवड) या मोहन विद्यालय, अकले शाळेच्या इयत्ता नववीतील विद्यार्थिनी आहेत. त्यांचे मृतदेह नदी लगत सापडल्याने दसपटी विभागात एकच खळबळ उडाली आहे.

    चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागात कादवड येथे वैतरणा नदीलगत दोन शाळकरी मुलींचे मृतदेह मिळाले आहेत. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या मुलींचा घातपात झाला किंवा कसे याबाबत चिपळूण पोलीस तपास करत आहेत. या दोन्ही शाळकरी मुलींचे मृतदेह कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

    कातकरी समाजातील या गरीब कुटुंबातील मुली असून त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. आज (१६ मार्च) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कादवड वैतरणा नदीतील एका डोहाजवळ त्यांचे मृतदेह आढळून आले. यानंतर तेथील ग्रामस्थांनी तात्काळ शिरगाव पोलिसांना खबर दिली. पोलीस दाखल होताच त्यांनी तात्काळ दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही मृतदेह आणले. दादर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed