• Thu. Sep 17th, 2026

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात अभिवादन

ByMH LIVE NEWS

Mar 12, 2024
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मंत्रालयात मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम-पाटील, अवर सचिव रवींद्र पेटकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

धोंडिराम अर्जुन/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed