• Sat. Sep 21st, 2024
तू कसा निवडून येतोस पाहतो म्हणालेले, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलेय, शिवतारेंचा शड्डू

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्ष आम्ही तुम्हाला निवडून देतोय, आता अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहेत. “शिवतारे कसे निवडून येतात पाहतोच” असं म्हणत अजितदादांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवतारेंना पराभवाची धूळ चारली होती.

विजय शिवतारे काय म्हणाले?

“म्हणून मोठ्यामोठ्यांशी पंगा घेतला, फक्त लोकांसाठी… एकच आपल्याला संदेश देतोय… लोकसभेची निवडणूक समोर आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा ताई.. चाललंय ना.. अरे बारामती हा देशातला एक लोकसभा मतदारसंघ आहे.. हा काही कोणाचा सातबारा नाही, की सतत बारामतीचा ५० वर्ष खासदार पाहिजे.. पुरंदरचा पाहिजे.. भोरचा पाहिजे.. का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच-पाच वेळा, दहा-दहा वेळा… काय मिळालं आम्हाला… विजयबापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी.. स्वाभिमानी जनतेचा अपमान केलाय.. तू कसा निवडून येतोस पाहतो म्हणालेले… आता त्याचा बदला घेण्याची वेळ आलेय..” असं विजय शिवतारे म्हणाले.

“६ लाख ८६ हजार मतदान महोदयांचं आहे, आणि ५ लाख ८० हजार मतदान पवार विरोधकांचं आहे… तुमचं आमचं सगळ्यांचं.. ६ लाखमध्ये दोन पवार, ५ लाखमध्ये एकटा विजय शिवतारे असेल घाबरु नका. ही लढाई आता आरपारची लढायची असा मी निर्णय घेतलाय.. आपल्याला कुणाची गुलामी नकोय.. किती वर्ष परत परत मतदान करायचं तुम्हाला…” असं शिवतारे म्हणाले.

डुप्लिकेट शिवसेना आणि डुप्लिकेट राष्ट्रवादी यांच्या वाटेला लोकसभेच्या ५ जागा येत नाहीत, राऊतांची टीका

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

“या पातलीतळाचा अपमान केलाय, त्याचा बदला घेतला पाहिजे.. इथेच येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे.. माझी चूक नाही, माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, पुरंदरच्या जनतेची माफी मागायला पाहिजे, दोन पवार विरुद्ध विजयबापू शिवतारे, पुरंदर, भोर, इंदापूर.. याला पाड त्याला पाड… एकदाचं यांना पाडा, होऊद्या कार्यक्रम.. या पुरंदरने इतिहास घडवलं आहे, इतिहास घडू द्या” असंही विजय शिवतारे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed