मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मतदारांसोबत आणि शिवसैनिकांसोबत जनसंपर्क सुरु आहे. कालप्रमाणे आजही उद्धव ठाकरे यांनी गोरेगावात शिवसैनिकांशी कुटुंबसंवाद या कार्यक्रमानिमित्त संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. जे लोक गद्दारी करुन गेले ते गद्दारीचा शिक्का पुसू शकणार नाहीत,असंही त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी कालच्या मुंबईतील कार्यक्रमात अमोल कीर्तिकर यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आक्षेप नोंदवले होते. मात्र, ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा दाखला देत आज देखील अमोल कीर्तिकर यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. अमोल कीर्तिकरांचा विजय हा असा तसा नको तर समोरच्यांचं डिपॉझिट जप्त करुन विजय हवा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.उद्धव ठाकरे यांनी आजही भाजपवर टीका केली. भाजपला वरपासून खालीपर्यंत लोकं आयात करावी लागत आहेत, असं म्हटलं. भाजपला आता जय आयाराम असं म्हणावं लागत असल्याचं ठाकरे म्हणाले. ओडिशामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या प्रशांतकुमार जगदेव यांना नवी पटनाईक यांनी पक्षातून काढून टाकलं होतं. पण, भाजपनं त्याला पक्षात घेत उमेदवारी दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. नवीन पटनाईक यांनी ज्याला बाहेर काढलं त्याला भाजपनं वाजत गाजत पक्षातं घेऊन उमेदवारी दिल्याचं ठाकरे म्हणाले. भाजपच्या खऱ्या कार्यकर्त्यांनी आता विचार करण्याची गरज निर्माण झाल्याचं ठाकरे म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
आमचं हिंदुत्व हे ज्वलंत आणि जीवंत आहे. गोरेगावातील शाखा ही रुग्णवाहिका, रक्तदान या साठी प्रसिद्ध आहे. कोणत्याही संकटात, नैसर्गिक संकट, अतिरेक्यांचा हल्ला असो पहिला धावून जातो तो शिवसैनिक असतो. काल आपण जोगेश्वरीत होतो, मुस्लीम लोकं मोठ्या संख्येंन आपल्यासोबत आलेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुस्लीम लोकं तुमचा भगवा आणि भाजपचा भगवा याच्यात फरक असल्याचं सांगतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारी हिंदुत्व तर भाजपचं घरं पेटवणारं हिंदुत्व आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं. देश हाच धर्म मानून देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊया,असं ठाकरे म्हणाले. आपल्यातील काही लोक जात आहेत, जाऊद्यात,असं ठाकरे यांनी म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहासाची उदाहारणं देत उद्धव ठाकरेंनी गद्दारी करणाऱ्यांवर टीका केली.
काल चार विधानसभा मतदारसंघात गेल्यानंतर अमोल कीर्तिकर यांचं नाव जाहीर केलं आहे. समोर कोणीही असो, समोरच्याचं डिपॉझिट जप्त करुन विजय हवाय. हा लढा गद्दार विरुद्ध निष्ठावान असा आहे. एका बाजूला देशभक्त आणि दुसऱ्या बाजूला द्वेषभक्त असा लढा आहे, असं ठाकरेंनी म्हटलं आहे.