रायगड: आपला बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच सकारात्मक असावा तर आणि तरच आपण पुढे आयुष्यामध्ये वाटचाल करू शकतो. हिची हिरव्या रंगाची साडी आहे तर मलाही हिरव्या रंगाची पैठणीच पाहिजे, असा आग्रह न करता तिच्यापेक्षा वेगळी साडी माझ्याकडे असेल तर मी उठून दिसेल. हाही दृष्टिकोन असला पाहिजे आणि पाडव्याला मंगळसूत्र हे नवऱ्यानेच घडवून द्यायला पाहिजे हा आग्रह न करता यंदाच्या पाडव्याला माझ्या पैशाने मी नवऱ्यासाठी नवीन घड्याळ आणेन, हाही विचार आपल्यामध्ये असला पाहिजे, अशी भूमिका महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला दिनानिमित्त मांडली आहे. महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
महिला दिन हा आपल्याला साजरा करायला मिळतो हे एक वैशिष्ट्य आहे. पुरुषांना पुरुष दिन मिळत नाही. आपल्याला वाढदिवस पण साजरा करायला मिळतो आणि महिला दिन पण साजरा करायला मिळतो. त्यामुळे वर्षातून दोन दिवस आपल्याला हक्काचे साजरे करायला मिळत असतात. यामुळे याचाही आनंद आपण घ्यायला पाहिजे. पाण्याचा ग्लास जर का असेल तर तो अर्धा आहे की भरलेला आहे हा बघण्याचा दृष्टिकोन आपला आहे. एका बाजूला हा आनंद पुरुषांना मिळत नसताना आपल्याला मिळतो याचाही अभिमान आपण या ठिकाणी बाळगला पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

आदिती तटकरे म्हणाल्या की, आई, बहीण, सून म्हणून तुम्ही जे जे कर्तव्य एका बाजूला पार पडतात, ते कर्तव्य एका बाजूला आहेत. पण ज्या वेळेला तुमच्या पतीच्या मुलाच्या मुलीच्या डोळ्यांमध्ये तुमच्या बद्दलचा तुमचा अभिमान दिसतो हा आनंद आयुष्यात वेगळा असतो आणि हा आनंद तुम्हा सर्वजणींना मिळायला हवा, अशीच अपेक्षा आम्ही या महिला दिनाच्या निमित्ताने करते, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी महिला दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.