• Sat. Sep 21st, 2024
जय श्री राम म्हण नाही तर… अंगावर लघुशंका करून भाजी विक्रेत्यास मारहाण, सोलापुरातील घटना

सोलापूर: शहरात एका भाजी विक्रेत्या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. भाजी विक्री करताना स्मितहास्य केले होते. तोच राग मनात धरून मारहाण करण्यात आली. अयान मुर्तुज बागवान असे जखमी युवकाचे नाव आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर दलित पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी जखमी युवकाची भेट घेतली आहे. तसेच त्याला न्याय मिळण्याची मागणी केली आहे.नेमकं काय घडलं?
अयान मुर्तुज बागवानविरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याची फिर्याद एका पीडित तरुणीने दिली. भाजी विक्रेत्या अयान बागवानने दुकानात येऊन मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले, अशा आशयाची फिर्याद एका पीडित तरुणीने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल केली. यानंतर टोळक्यानं आमच्या गल्लीत भाजी विकायला यायचे नाही, तू मुलींची छेड काढतो, अशी कारणे सांगत अयान बागवान आणि यासिन पटेल या दोन भाजी विक्रेत्यास मारहाण करण्यात आली. लाकडी दांडका, कमरपट्टा आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जय श्रीराम म्हण, असे सांगितले. अयान बागवानच्या अंगावर लघुशंका करून जखमी युवकाचा मित्र यासिन पटेलला देखील मारहाण करण्यात आली आहे.
क्षुल्लक वादाचं रुपांतर हाणामारीत, दोघांनी कळस गाठला अन् तरुणाच्या मृत्यूनं परिसर हादरला
या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात सार्थक खुबा, अभिषेक दुलंगे, सचिन ढोणे, भाईजी, गणेश गुरूभेटी, निखिल, सचिन दुर्गे, प्रशांत पवार, बनी कोळी, धीरज ,वायके, बिरु पुजारी आणि इतर तीन ते चार तरुणांनी मारहाण केली, अशी फिर्याद जखमी युवकाने दिली आहे. मारहाण करताना जय श्री राम म्हण असे सांगत मारहाण केली. अंगावर लघुशंका केली, अशी फिर्याद दाखल झाल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. मारहाण करणाऱ्या संशयित आरोपी विरोधात भा.द.वि ३६३, ३२७, ३२४, १४२, १४३, १४७, १४८, ५०६ आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

दलित पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. एका मुस्लिम भाजी विक्रेत्या तरुणाला टोळक्याने जबरदस्त मारहाण केली. जय श्री राम घोषणा दे असे सांगून सर्वांगास मारहाण केली. अंगावर लघुशंका केली अशी माहिती मिळाताच दीपक केदार यांनी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी अयानची विचारपूस केली. जखमी तरुण हा रडत रडत दीपक केदार यांना माहिती देत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. हा व्हिडीओ दलित पँथर सेनेचे दीपक केदार यांनी ट्विट करता जस्टीस फॉर अयान बागवान, असे आवाहन केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे.

सिंधुदुर्गमधील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा, MLA नितेश राणे रुग्णालयात, प्राचार्यांना सुनावले खडे बोल

यानंतर दलित पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी ट्विट करत न्याय मिळावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. तर भीम आर्मीचे अजय मैंदर्गीकर यांनी मारहाण करणाऱ्यांना हिंदू आतंकवादी, असे संबोधित करत कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, भाजी विक्रेता अयान बागवान या विरोधात भा.द.वि.३५४(ड),५०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. भाजी विक्रेता अयान बागवान हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून अधिक तपास जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed