• Mon. Nov 25th, 2024

    महिलेची पर्स हिसकावून चोरटे पसार, पोलिसांचा अथक तपास, अखेर साडेतीन महिन्यांनी आरोपींना बेड्या

    महिलेची पर्स हिसकावून चोरटे पसार, पोलिसांचा अथक तपास, अखेर साडेतीन महिन्यांनी आरोपींना बेड्या

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: साडेतीन महिन्यांपूर्वी पाचपावली परिसरातून एका महिलेल्या गळ्यातील पर्स हिसकावून पळून जाणाऱ्या दोघा चोरट्यांना गुन्हेशाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलिस पथकाने अटक केली.सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या अलका सांगोळे (वय ४२ वर्षे) १७ नोव्हेंबर २०२३ रोजी आपले काम आटोपून पाचपावली हद्दीतून पायी घरी जात असताना दोन व्यक्तींनी दुचाकीने येत त्यांच्या गळ्यातील पर्स बळजबरीने हिसकावून नेली. या पर्समध्ये दोन मोबाइल, एटीएम कार्ड, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदार कार्ड यासह एकूण ३० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल होता.

    सागरी सेतूसाठी ०.५९ टक्का तरतूद, वर्सोवा-विरार मार्ग; पहिल्या टप्प्यासाठी १५० कोटीमहारा

    तपासानंतर पोलिसांनी न्यू इंदोरा परिसरात राहणाऱ्या आकाश निवृत्ती चंदनखेडे (वय ३० वर्षे) अश्विन वामन माहुरे (वय ३६ वर्षे) या दोघांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून मोबाइलसह गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे, साहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान बजबळकर, पोलिस उपनिरीक्षक मधुकर काठोके, सतीश पांडे, दशरथ मिश्रा, विजय श्रीवास, संतोषसिंग ठाकूर, जितेश रेड्डी, दीपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार, दीपक लाकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed