• Sat. Sep 21st, 2024
महायुतीत बिघाडी होणार? ठाण्यात भाजपची तयारी सुरू, विनय सहस्रबुद्धेचं प्लॅनिंग

नवी मुंबई: ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. हा मतदारसंघ आमचा पूर्वीपासून होता, या मतदारसंघात अनेकांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा आम्हाला मिळावा अशी सर्व कार्यकर्त्यांची नागरिकांची मागणी असल्याचं सांगत सहस्रबुद्धे यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. भारतीय जनता पार्टीचे संयोजक खासदार विनय सहस्रबुद्धे हे नवी मुंबईतील नेरुळ येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या महिला मेळाव्याच्या कार्यक्रमात आले होते. तिथे बोलताना त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य आहे, पण मोदींना पाठिंबा देणारा आणि त्याच्या विचारांवर काम करणारे नेतृत्व असणार, हे नक्की असंही सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघावरून आता महायुतीमध्ये बिघाडी होणार हे मात्र नक्की. कारण, ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजप आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. ठाणे-कल्याण हा संयुक्त मतदार संघ एकेकाळी होता. त्यामुळे पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची भूमिका आहे की हा मतदारसंघ भाजपने लढवावा, तशी इच्छा आहे या विषयी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, तसं बावनकुळे यांनीही सांगितले आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारा उमेदवार हा मोदींचे हात बळकट करणारा असेल. तसेच, यावेळी अमित शहा शिंदे, फडणवीस यांच्या बैठकी बाबत चर्चा केली असता, या बैठकीला मी नव्हतो. त्यामुळे बैठकीत काय झाले हे तेच सांगतील. कार्यकर्त्यांच्या भावना लोकांच्या इच्छा सर्वांचा विचार करून महायुतीचे नेते योग्य निर्णय घेतील. नवी मुंबईतील संजीव नाईक इच्छुक जरी असले, तरी इथून कोणालाही उमेदवारी मिळू शकते, फक्त निवडून येणारा उमेदवार हा नरेंद्र मोदींच्या मागे आपली ताकत उभी करणारा उमेदवार असेल एवढे नक्की आहे.

मात्र, रवींद्र फाटकांच्या नावाची चर्चा जरी असली तरी मोदींच्या मागे उभा राहणारा ताकतवान उमेदवार असेल हे नक्की असल्याचे सांगत त्यांनी याचे संकेत दिले की मोदींच्या विचारांवर चालणारा म्हणजेच भाजपाचा उमेदवार असणार हे नक्की. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे लोकसभा मतदारसंघा वरून आता महायुतीमध्ये बिघाडी होणार, हे मात्र नक्की कारण ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजप आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed