भाजपवर जोरदार हल्लाबोल
एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि राजधानी आहे या जिल्ह्यांमध्ये आपल्या हक्काचा भगवा फडकणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. पुन्हा जर का भाजपचं सरकार चुकून निवडून आलं तर ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुन्हा येईन म्हणणारे घरी जातात ते पुन्हा विधानसभेत येऊ शकत नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुन्हा येण्याचा आत्मविश्वास असेल तर पक्ष का फोडताय, असा सवाल त्यांनी केला. तुमच्यावरील संकटाच्या काळात उभ्या राहिलेल्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तुम्ही संपवायला निघालात, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी प्रहार केला.
इथल्या खासदारानं गद्दारी केली त्यांना आडवं करायचं आहे. राजकारणातील सर्वपक्षीय शेठ मंडळी आहेत त्यांची दुकानं बंद करण्याची वेळ आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पनवेलमधून एकही मत त्या गद्दाराला मिळू नये, असं आवाहन ठाकरेंनी केलं. बाळासाहेब ठाकरेंनी, बाळासाहेबांच्या कुटुंबानं तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं दिलं तरी तुम्ही पाठीत वार केलात, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
मध्य प्रदेशातील निवडणुकीत नरेंद्र मोदींनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला पुढील चार दिवसात अजित पवार तिकडे गेलेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला त्यानंतर चार दिवसात अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
निष्ठेने आपण एकत्र आलेलो आहोत, कार्यालयाच्या उद्घाटनाला आपण जमलो आहोत तर इतकी गर्दी झालीय तर विजयाच्या मिरवणुकीला किती गर्दी असेल, असं ठाकरे यांनी म्हटलं. तुम्हाला संजोग वाघेरे यांच्या रुपानं चांगला पर्याय दिला आहे, असं ठाकरे यांनी सांगितलं. काही नसताना संजोग वाघेरे सत्ता आणायची आहे, यासाठी आपल्या पक्षात आले, असं ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी सज्ज झालाय, असं ठाकरे म्हणाले.