• Sat. Sep 21st, 2024

अ‍ॅप प्रदूषण तक्रारींचा, पण मुंबईकर विचारताय भलतेच प्रश्न, ‘मुंबई एअर’ अ‍ॅप नेमका कशासाठी? जाणून घ्या

अ‍ॅप प्रदूषण तक्रारींचा, पण मुंबईकर विचारताय भलतेच प्रश्न, ‘मुंबई एअर’ अ‍ॅप नेमका कशासाठी? जाणून घ्या

मुंबई : शहरात प्रदूषण किती आहे… ‘मॉर्निंग वॉक’ला जाऊ शकतो का… गटारे तुंबली आहेत…पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे…अशा विविध तक्रारींचा भडीमार सध्या मुंबई महापालिकेच्या ‘मुंबई एअर’ अॅपवर सुरू आहे. या अॅपवर प्रदूषणाबाबतच्या तक्रारी अपेक्षित असताना नागरी सुविधांबाबतच्या तक्रारींची संख्या लक्षणीय असल्याने अॅपच्या जनजागृतीच्या अभावाबरोबरच पालिकेच्या तक्रार निवारणाच्या अन्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे.

मुंबईतील हवा प्रदूषणाबाबत तक्रारींसाठी संकेतस्थळ (वेब पोर्टल) आणि मोबाइल अॅप विकसित करण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेला केली होती. त्यानुसार, पालिकेने ‘मुंबई एअर’ नावाचे अॅप विकसित केले. मुंबईकरांना ५ फेब्रुवारी २०२४ पासून या अॅपचा वापर करून तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक विभागनिहाय तक्रार दाखल करण्याची सुविधाही त्यात आहे.

तक्रारदाराला तक्रारीचे स्वरूप, तक्रारींचा तपशील, ठिकाण, रस्त्याचे नाव, विभागाचे नाव, तक्रारींशी संबंधित छायाचित्रे आदी बाबींचा तपशील द्यावा लागतो. या अॅपवर आतापर्यंत २२१ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात विविध कारणांमुळे धूळ प्रदूषण झाल्याविरोधात ११९ तक्रारी अॅपवर करण्यात आल्या होत्या. ६० तक्रारी कचरा किंवा अन्य वस्तू जाळल्याने झालेल्या प्रदूषणाबाबत आहेत. दुर्गंधी पसरल्याने त्याविरोधात ४२ तक्रारी आल्याची माहिती देण्यात आली. त्यातील बहुतांश तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. मात्र, या अॅपवर नागरी समस्यांच्या तक्रारींची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे ५ फेब्रुवारीला हे अॅप सेवेत आल्यानंतर ते अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यात पालिकेला अपयश आल्याचे दिसते.
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलात १,४६५ पदांची भरती, पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांची माहिती, जाणून घ्या
अन्य सुविधांची मर्यादा उघड

नागरी सुविधांबाबत तक्रारींसाठी मुंबई महापालिकेच्या १९१६ हेल्पलाइन, माय बीएमसी २४ बाय ७ मोबाइल अॅपसह चॅटबोट सुविधाही आहे. त्यात मुंबईतील पालिकेच्या २४ वॉर्डमधील नियंत्रण कक्षाची माहितीही दिली आहे. तरीही ‘मुंबई एअर’ अॅपवर नागरी समस्यांच्या तक्रारी करण्यात येत असल्याने पालिकेचा तक्रार निवारण सुविधा अपुरी पडत असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed