• Sat. Sep 21st, 2024

उड्डाणपुलावर दुचाकीची जोरदार धडक, डोक्याचा चेंदामेंदा, रस्त्यावर रक्ताचा सडा; एकाचा मृत्यू

उड्डाणपुलावर दुचाकीची जोरदार धडक, डोक्याचा चेंदामेंदा, रस्त्यावर रक्ताचा सडा; एकाचा मृत्यू

सातारा : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर उंब्रज (ता.कराड) गावच्या हद्दीत उड्डाणपुलावर कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकीला अपघात झाला. यामध्ये २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाला, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. सूर्यकांत शहाजी भोसले (वय २२) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर यश भाऊबीज काळे (वय २२) असे जखमी युवकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंब्रज (ता. कराड) गावच्या हद्दीत आशियाई महामार्गावरील उड्डाणपुलावर कराड ते सातारकडे जाणाऱ्या लेनवरून घरी निघालेल्या दोन युवकांच्या दुचाकीला (एमएच ११ सीपी ९५४९) अज्ञात वाहनाची जोरात धडक बसली. या धडकेत एक युवक जागीच ठार झाला. तर दुसराजण गंभीर जखमी झाला आहे. सूर्यकांत शहाजी भोसले (वय २२, रा. आसगाव, ता. जि. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर यश भाऊबीज काळे (वय २२, रा. फत्तेपूर (नागठाणे) ता. जि. सातारा) असे जखमी युवकाचे नाव आहे.
ऋषभ पंतनंतर अजून एका क्रिकेटरचा गंभीर अपघात, बाईक चक्काचूर, IPL मध्ये ३.६ कोटी मिळाले होते…

घटनेची माहिती मिळताच, नागरिक व पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पाटील, पोलीस हवालदार सोरटे, भोसले, होमगार्ड काळभोर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. अपघात इतका भीषण होता की, डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमीला उपचारासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उंब्रज पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. काहीकाळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed