• Sat. Sep 21st, 2024
जुन्या वादाचा राग, तहसील कार्यालयात भरदिवसा चाकूने वार, सरकारी कर्मचाऱ्यांसमोर हत्या

पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून चाकूने गळा कापून हत्या केल्याची घटना वाशिमच्या कारंजा तहसील कार्यालय परिसरात भरदिवसा घडली आहे. तहसील कार्यालयात खासगी दस्तलेखणाचे काम करणाऱ्या हरिषचंद्र विश्राम मेश्राम (रा. मेहा ता. कारंजा) यांचा धारदार चाकूने गळा कापून १ मार्च २०२४ रोजी अंदाजे दुपारी २ वाजताच्या सुमारास कारंजा तहसील कार्यालय परिसरात हत्या करण्यात आली. भरदिवसा तहसील कार्यालय परिसरात खून झाल्याने कारंजा शहरात एकच खळबळ उडाली.पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे फिर्यादी दिनकर विश्राम मेश्राम (वय ४६, रा. मेहा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रेमदास उध्दवराव भगत याने सरकारी जागेत असलेला हात पम्प काढून त्यामध्ये मोटार पम्प टाकून स्वतः वापरत असल्याने हरिचंद्र मेश्राम यांनी त्याची ग्रामपंचायत मेहा येथे तक्रार केली होती. यावरून ४ डिसेंबर २०२३ रोजी आरोपीने हरिशचंद्र यांच्यासोबत भांडण करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. हरिचंद्र विश्राम मेश्राम यांनी पोलीस स्टेशन धनज येथे रिपोर्ट दिला होता. तर मागील १० दिवसांपूर्वीसुध्दा प्रेमदास उध्दवराव भगत याने मयत हरिचंद्र मेश्राम व त्यांची पत्नी सोनाली यांच्यासोबत भांडण केले होते. हरिषचंद्र यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याचा राग आरोपीच्या मनात होता.
फडणवीसांशी गप्पा, शिंदेंची घेतली गाठ; सुप्रिया ताईंची अजितदादांकडे पाठ, नजरानजरही टाळली
आज हरिश्चंद्र हे कारंजा तहसीलमध्ये खासगी दस्तलेखनाचे काम करत होते. आरोपी प्रेमदास उद्धवराव भगत आणि मिथून विठ्ठलराव शिरसाठ यांनी संगनमत करून मिथून शिरसाठ याने हरीशचंद्र यांच्या मानेवर व गळ्यावर धारधार चाकूने वार करून हरीशचंद्र यांना गंभीर जखमी करुन जिवाने ठार मारले. यावरून दोन्ही आरोपींविरुद्ध कारंजा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

भरदिवसा तहसील कार्यालयात खून झाल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असताना पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ पथके नेमून यातील एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. हरिशचंद्र यांची हत्या करून पळून गेलेल्या दोन आरोपींपैकी मिथून शिरसाठ याला पाच तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून दुसऱ्या आरोपीचा शोध कारंजा पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed