• Sat. Sep 21st, 2024

१४ लाख बोगस अॅन्टिबायोटिकची खरेदी, हरियाणातील एजन्सीकडून आला साठा; निर्मात्याचा शोध सुरू

१४ लाख बोगस अॅन्टिबायोटिकची खरेदी, हरियाणातील एजन्सीकडून आला साठा; निर्मात्याचा शोध सुरू

नागपूर : जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मूळ विक्रेत्याकडून १४ लाख बोगस अॅन्टिबायोटिकची खरेदी करण्यात आल्याची बाब पुढे आली. कॅभीज कंपनीने हरियाणातील के. पी. मेडिकल एजन्सीकडून या औषध खरेदी केल्याचे तपासात पुढे आले. नागपूरसह महाराष्ट्र आणि देशभरात हे बोगस औषधांचे रॅकेट सक्रिय असल्याचे पुढे आले आहे. हरियाणातील विक्रेताही संशयास्पद असून मूळ निर्मात्याचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलीस आता लवकरच हरियाणाला जाणार आहेत.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाकडून वेळोवेळी औषधांची तपासणी केली जाते. याचाच भाग म्हणून फेब्रुवारी २०२३ मध्ये कळमेश्वर शासकीय रुग्णालयातून रेसीप ५०० (recip 500) ब्रँडच्या औषधीचे नमुने गोळे केले होते. प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये याचा अहवाल प्राप्त झाला. यात औषधीत महत्त्वपूर्ण असलेला सीप्रोफ्लोक्सेसीन ५०० (coprofloxacin 500) हा घटकच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला ही बाब ९ डिसेंबर २०२३ रोजी कळविण्यात आली. अॅन्टीबायोटिक औषधीत महत्त्वाचा घटकच नसल्याने त्या सर्व औषधी परत बोलाविण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला देण्यात आल्या. मात्र, नागपूर जिल्ह्याला पुरवठा झालेल्या ४ लाख टॅबलेटपैकी केवळ २१ हजार ६०० टॅबलेट शिल्लक होत्या. या टॅबलेट एफडीएने जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहे.
स्वतंत्र लढलो तर किमान लोकसभेच्या ६ जागा जिंकू, जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच आंबेडकरांचं विधान

बोगस औषधीचे मोठे रॅकेट

नागपूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे लातूर येथील जया एन्टरप्रायजेस यांच्याकडून हा पुरवठा करण्यात आला होता. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे भिवंडी येथील अॅक्वेंटिस बायोटेक (Acventis Biotech) यांच्याकडून हा पुरवठा करण्यात आला. पुढील तपासात ठाण्याच्या कॅभीस (Cabhis) या कंपनीकडून या औषधीचे वितरण झाल्याचे पुढे आले. या औषधीवर केरळ येथील रेफंट फार्मा (Refant Pharma) या उत्पादकाचे नाव होते, मात्र अशी कुठलीच कंपनी अस्तित्वात नसल्याचेही तपासात पुढे आले.

कॅभीज कंपनीच्या एकाला अटक करण्यात आली होती. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार हरियाणातून हा साठा वितरित झाला. एफडीएचे सहआयुक्त विराज पौनिकर यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त निरज लोहकरे, औषध निरीक्षक नितीन भांडारकर यांच्या पथकाने कारवाई केल्यानंतर पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या पथकाकडे आहे. हरियाणात के. पी. मेडिकल या नावाने एजन्सी अस्तित्वात असल्याची माहिती मिळाली. मात्र सध्या ती सक्रिय नाही, असे म्हस्के यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed