• Sat. Sep 21st, 2024
अमरावतीतील पेपरफुटी प्रकरणाला वेगळं वळण, पोलिसांची मोठी कारवाई; जाणून घ्या…

अमरावती : मृद व जलसंधारण विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणाची तक्रार करणारा एकमेव फिर्यादी व ए.आर.एन असोसिएट या परीक्षाकेंद्राचा व्यवस्थापक मयूर बडगुजर यांच्यासह सात आरोपींना नांदगाव पेठ पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील आरोपींची संख्या आता १० झाली आहे. या प्रकारानंतर नांदगाव पेठचे ठाणेदार हणमंत डोपेवाड व गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणाला गंभीरपणे हाताळण्यात येत आहे.२१ फेब्रुवारी रोजी ड्रीमलँड नांदगाव पेठ येथील ए.आर.एन असोसिएट या परीक्षा केंद्रावर मृद व जलसंधारण विभागाच्या पेपरला संबधीत विभागाचे अधिकारी प्रशांत आवंदकर यांनी यश कावरे या उमेदवाराला नक्कलच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे लिहून दिल्याने पेपरफुटीचे प्रकरण चव्हाट्यावर आले. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी केलेल्या गोंधळानंतर ए.आर.एन असोसिएटचे व्यवस्थापक मयूर बडगुजर यांनी या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर यश कावरे याला अटक करण्यात आली होती.
शाहू महाराजांनी उभं राहू नये, अन्यथा पाडण्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करू: हसन मुश्रीफ
पोलीस या प्रकरणाला गांभीर्याने घेत असून दररोज नवनवीन खुलासे या प्रकरणातून बाहेर येत आहे. २६ फेब्रुवारी रोजी राहुल लिंगोट व किशोर डोंगरे या दलालांना अटक करण्यात आल्यानंतर बुधवारी रात्री मुख्य फिर्यादी असलेला मयूर रवींद्र बडगुजर (वय ३३) राहणार झेंडा चौक, राजापेठ अमरावती, स्वप्नील राहुल साळुंखे (वय ३२) दत्तकृपा कॉलनी, मार्डी रोड अमरावती, प्रतीक जुगलकिशोर राठी (वय ३०) राहणार साईनगर अमरावती, संगमेश्वर नामदेव सरकाळे (वय २५) राहणार किशोर नगर, भगतसिंग चौक अमरावती, उद्देश विनोद काळबांडे (वय २५) राहणार गोपाल नगर अमरावती, रोहन जयप्रकाश अडसड (वय ३६) राहणार दत्तकृपा कॉलनी मार्डी रोड अमरावती, शंतनु सुनील बर्वे (वय २०)डवरगाव, अमरावती या सात आरोपींना अटक करण्यात आली.

पेपरफुटीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आजवर १० आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. लवकरच मुख्य सूत्रधार पकडण्यात पोलिसांना यश मिळेल असे दिसत आहे. परंतु या प्रकरणातील नक्कल पुरविणारा आरोपी अधिकारी प्रशांत आवंदकर अजूनही पोलिसांना गवसला नाही हे न समजणारे कोडे आहे. परंतु पोलीस दोन्ही बाजू समजून घेऊन योग्य दिशेने तपास करत कारण हा विषय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संदर्भात आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन चौकसपणे विविध पैलूंचा अभ्यास करत करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड यांनी ”महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन”ला दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed