• Mon. Nov 25th, 2024

    अजय बारस्कर यांना स्वत:च्या गावातच विरोध, गावकऱ्यांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, एकमताने ठराव

    अजय बारस्कर यांना स्वत:च्या गावातच विरोध, गावकऱ्यांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, एकमताने ठराव

    अहमदनगर : मराठा अरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी अजय बारस्कर महाराज यांनी अलीकडेच जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर जरांगे यांच्याकडूनही बारस्कर यांच्यावर पलटवार करण्यात आला. राज्यभर बारस्कर यांचा निषेध सुरू झाला. त्यावेळी बारस्कर यांनी आपल्याला गावाची साथ असल्याचे वक्तव्य केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर आता बारस्कर यांच्या सावेडी (ता. नगर) या गावाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. गावाने ठरावून करून आपण बारस्कर यांच्यासोबत नव्हे तर जरांगे यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका मांडणात आलीच, सोबतच गावात ठिकठिकाणी तसे फलकही लावण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर सकाल मराठा समाजाने केलेल्या तक्रारीनंतर शेजारच्या बोल्हेगाव येथील चौकात बारस्कर यांनी केलेले अतिक्रमण आणि महापुरुषाचा पुतळाही काढून टाकण्यात आला आहे.मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणारे बारस्कर नगरच्या सावेडी गाव परिसरात राहतात. जरांगे पाटील यांच्या पाठिशी सावेडी गावातील मराठा बांधव भक्कमपणे उभे असल्याचा एकमताने ठराव करण्यात आला आहे. नगर शहरातील सावेडी गावठाण परिसरातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर यांचा सर्वानुमते सावेडी गावाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक कुमार वाकळे, रवींद्र बारस्कर, बबन बारस्कर, राजेंद्र वाकळे, यशदेव बारस्कर, सरेश करपे, राजेंद्र काळे, रवींद्र वाकळे, सचिन बारस्कर, नितीन बारस्कर आदी उपस्थित होते. तसेच त्याच्या वक्तव्याला सावेडी ग्रामस्थांचे अजिबात समर्थन नाही, असा एकमताने निर्णय घेण्यात आला.

    जरांगेंच्या वक्तव्यावर विधानसभेत गोंधळ,शेलांरांच्या मागणीवर एसआयटीची घोषणा, थोरात वडेट्टीवारांनीही सगळं काढलं

    संपूर्ण सावेडी गावातील मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी उभारलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या लढाईला सदैव साथ देणार असल्याचेही यावेळी ग्रामस्थांनी ठराव केला. गावातील ग्रामस्थांचा कोणत्याही प्रकारे बारस्कर यांच्या वक्तव्यांना पाठिंबा नाही. त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे पत्र अहमदनगर येथील मराठा क्रांती मोर्चा यांना दिले आहे.

    माझ्याविरोधात बोलण्यासाठी बारसकरने ४० लाख घेतले, मला बदनाम करण्यासाठी शिंदे- फडणवीसांचा ट्रॅप | जरांगे

    शेजारच्या बोल्हेगाव येथील चौकात बारस्कर यांनी एक पत्र्याचे शेड उभारून तेथे महापुरुषाचा अर्धाकृती पुतळा बसविला होता. महापालिकेच्या जागेत हे अतिक्रमण असल्याचे तक्रार सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली होती. यासंबंधी नोटीस आल्यानंतर बारस्कर यांच्याकडून हे अतिक्रमण काढून घेण्यात आले. बारस्कर सध्या नगरमध्ये नाहीत, त्यांच्या समर्थकांनी हे अतिक्रमण काढून घेतल्याचे सांगण्यात येते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *