• Sat. Sep 21st, 2024
विजयदुर्गच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि कान्होजी आंग्रे यांचं स्मारक होणार, दीपक केसरकरांची घोषणा

सिंधुदुर्ग: जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्ट्या विकसित असलेला मालवण तालुक्याकडे पाहिला जातो. या ठिकाणी पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असतो. त्यामुळे मालवण तालुका हा पर्यटनाचा नकाशावर पोहोचला आहे. त्याप्रमाणे पर्यटकांच्या पसंतीचा ठरला. परंतु मालवण या भागाचा पर्यटनदृष्या जेवढा विकास झाला तेवढा विकास इतर तालुक्यामध्ये दिसत नाही. देवगड तालुक्यात अनेक ठिकाणी पर्यटकांना खुणावणारे असे नयन ऐतिहासिक महत्व असणारी पर्यटनस्थळं आहेत.
देशात आणखी १८ अणुभट्ट्या उभारणार, अणुप्रकल्पांची क्षमता २२,४८० मेगावॉटपर्यंत पोहोचणार
मात्र सध्या पर्यटनदृष्ट्या दुर्लक्षित आहेत. यासाठीच पर्यटनाला चालना देण्यासाठी देवगडमध्ये एका शासकीय कार्यक्रमांमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे देवगड तालुका हा पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर पोहोचण्यासाठी प्रयत्न होणार आहे. देवगडचा “विजयदुर्ग किल्ला” हा पर्यटनाचा केंद्रबिंदू मानला जात आहे. म्हणून दीपक केसरकर यांनी केलेल्या घोषणामुळे देवगड तालुक्याला पर्यटन दृष्ट्या उभारी मिळणार आहे.

मनोज जरांगेंच्या आदेशावर मराठा समाज पुन्हा रस्त्यावर, धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

छत्रपती शिवाजी महाराजांचं नेव्हल हेड कॉटर हे विजयदुर्गला होतं. विजयदुर्गला आजही त्यांच्या नावा बांधण्याचा जेटीज आहेत आणि शेवटचा जो किल्ला पडला तो विजयदुर्ग किल्ला होता. ब्रिटिशांनी आणि पेशव्यांनी एकत्र हल्ला केला म्हणून पराभव झाला. अभयद्य असं हे आरमारी केंद्र होत. आमदार नितेश राणे यांचं आग्रह होता की कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक व्हावं, अशी इच्छा होती. यासाठी ५ कोटी रुपयांची निधी मंजूर केला, अशी घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळे सुंदर असं स्मारक विजयदुर्ग किल्ल्या ठिकाणी बनेल. हे स्मारक बनण्यासाठी सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून डिझाईन बनवली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed