• Thu. Nov 28th, 2024
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् नारायण राणेंची बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण

    मुंबई : भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंद दाराभेट झाली आहे. भेट घेतल्याने आता या भेटीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झालं आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती? याचा तपशील समजू शकणार नसला तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी निवडणूक लढवावी, असे आदेश भाजपच्या नेतृत्वाने दिले आहेत. मुख्यमंत्री व नारायण राणे यांची सह्याद्री अतिथिगृहावर बंद दाराआड भेट झाली आहे. ही भेट वैयक्तिक असल्याचं सांगितलं जात आहे.शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी महायुतीकडून नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी आता राणे यांना महायुतीच्या नेत्यांचीही मदत लागू शकते. शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांचे नाव या लोकसभा मतदारसंघासाठी यापूर्वी चर्चेत होतं. मात्र, आता या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कोकणाचा मोठा अभ्यास व मोठा संपर्क असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
    ५० एकर जमीन लाटल्याचा संजय राऊतांचा आरोप, विखे म्हणाले, कोर्टात दावा ठोकणार नाहीतर…
    हा मतदारसंघ सध्या ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. विनायक राऊत हे या मतदारसंघाचे सध्या विद्यमान खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला ही जागा कोणत्या परिस्थितीत जिंकायची आहे, यासाठी तयारी सुरू झाली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून ही भेट असण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी वर्तवली आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed