ते म्हणतात ना घार आकाशी, पण लक्ष पिल्यापाशी, तसं भाग्यश्रीचे झाले. अधूनमधून ती बाळाला येऊन बघत होती. आपल्या आईची शिक्षणाची तळमळ कदाचित त्या बाळाने बघितलं असावी. तो ही पेपर होतपर्यंत निवांत झोपी गेला. एकीकडे शिक्षण घेण्याची जिद्द तर दुसरीकडे आईची माया परीक्षा केंद्रावर दिसली.
भाग्यश्री रोहित सोनुले ही कोठारी गावातील राहणारी. तिच्या लग्नाला दोन वर्ष झाली. तिला दोन महिन्यांचा मुलगा आहे. लग्न झालं तरी भाग्यश्रीने शिक्षण सोडलं नाही. या वर्षी ती बारावीमध्ये होती. आज बारावीचा इंग्लिशचा पेपर होता. भाग्यश्री यांचे पती रोहित सोनुले हे मोलमजुरी करतात. त्यामुळे आज ते घरी नव्हते. पती घरी नाही, घरी बाळाला सांभाळायला कोणी नाही म्हणून भाग्यश्री बाळाला सोबत घेऊन परीक्षा केंद्रावर आली. तिने सोबत पाळणा घेत परीक्षा केंद्र गाठलं.
परीक्षा केंद्राचा परिसरात असलेल्या झाडाखाली तिने बाळाचा पाळणा ठेवला. परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी आलेल्या एका महिला पोलिस कर्मचार्याकडे सोपाविले. तिने बाळाचा सांभाळ केला. भाग्यश्रीने पेपर सोडविला.