• Wed. Sep 16th, 2026

पत्नी व मुलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न;खोलीत डांबले,सिलेंडरचा पाइप काढून आग लावण्याचा प्रयत्न

पत्नी व मुलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न;खोलीत डांबले,सिलेंडरचा पाइप काढून आग लावण्याचा प्रयत्न

नागपूर: तापट स्वभावाच्या पतीने पत्नी व मुलांना खोलीत डांबून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओमनगरमधील जगनाडे ले-आऊट भागात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.

रंजन गणेशप्रसाद शाव (वय ४६,रा. रा. युनिक शैलपुत्री अपार्टमेंट),असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रंजन यांची पत्नी मीनू (वय ४३),त्यांचा १४ वर्षीय मुलगा व आठ वर्षीय मुलगी ,अशी थोडक्यात बचावलेल्यांची नावे आहेत. रंजन हे रेल्वे को-ऑपरेटिव्ह बँकेत मुख्य लिपिक आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजन हे नेहमी वाद घालून पत्नीला मारहाण कराययचे. सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास रंजन यांनी मीनू यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर मीनू व दोन मुलांना फ्लॅटमधील खोलीत डांबले. गॅस सिलंडरचा पाइप काढला. त्यामुळे संपूर्ण घरात गॅस पसरला. हातात माचिस घेऊन रंजन हे ‘तिघांना संपवूनच टाकतो’,अशी आरडा-ओरड करायला लागले.

मीनू यांनी भावाच्या मोबाइल संपर्क साधून मदतीसाठी याचना केला. त्यानंतर मीनू यांनी मदतीसाठी आरडा-ओरड करायला सुरुवात केली. संपूर्ण अपार्टमेंटमध्ये गॅस पसरला. वासामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. एका रहिवाशाने कोराडी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कोराडी पोलिसांचा ताफा अग्निशन विभागाच्या जवानांसह तेथे पोहोचला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने रंजन यांना ताब्यात घेऊन अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed