• Sat. Sep 21st, 2024

सिलेंडरच्या स्फोटामुळे डेकोरेशनच्या दुकानात भीषण आग, अग्निशमन दलामुळे आगीवर नियंत्रण

सिलेंडरच्या स्फोटामुळे डेकोरेशनच्या दुकानात भीषण आग, अग्निशमन दलामुळे आगीवर नियंत्रण

नागपूर: नागपूरच्या नंदनवन परिसरात सोमवारी एका डेकोरेशनच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सिलिंडरचा स्फोट होऊन दुकानाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण दुकान जळून खाक झाले. सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना नागपूरच्या नंदनवन येथील न्यू डायमंड नगर परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आमदार गणपत गायकवाड यांचा भाऊ अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयाची तोडफोड, कर्मचाऱ्यांनाही मारहाण
मिळलेल्या माहितीनुसार, नागपुरातील नंदनवन परिसरातील न्यू डायमंड नगर येथे राजू आरामानंद सागरक यांचे घर आहे आणि खाली डेकोरेशन दुकान आहे. बुधवारी रात्री अचानक त्यांच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सिलिंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण डेकोरेशनचे दुकान आगीत जळून खाक झाले आहे. कपड्यांसोबतच सजावटीच्या दुकानात बरेचसे लाकडी फर्निचर ठेवण्यात आले होते. डेकोरेशनच्या दुकानात सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्यांनाही आग लागली.त्यानंतर एकामागून एक सिलिंडर ब्लास्ट होऊ लागले. त्यामुळे ही आग झपाट्याने पसरली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या सुमारे ६ ते ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाचे जवानांनी पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवले. आग कशी लागली याचा तपास अग्निशमन दल आणि पोलीस करत आहेत.

रितेश देशमुख भावुक झाले, स्टेजवरचे सगळे रडले, अश्रू पुसण्यासाठी अमित देशमुख सरसावले

आगीत घराचे मोठे नुकसान
नागपुरातील नंदनवन परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिलिंडर फुटून आग लागल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली. घराला आग लागल्यानंतर दूरवरून आगीच्या ज्वाला दिसत होत्या. या परिसरात एकापेक्षा जास्त सिलेंडरचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या आगीत मंडप डेकोरेशन सामान किराणा सामान एक गाडीसहित अंदाजे ३० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed