• Sat. Sep 21st, 2024

जरांगेंशी फोनवर बोलण्याची विनंती केली, मात्र मुख्यमंत्र्यांचा नकार, मराठा समन्वयकांचा आरोप​​

जरांगेंशी फोनवर बोलण्याची विनंती केली, मात्र मुख्यमंत्र्यांचा नकार, मराठा समन्वयकांचा आरोप​​

कोल्हापूर: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह येथे मराठा समन्वयकांची बैठक बोलावली होती. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील समन्वयक या बैठकीला उपस्थित होते. मात्र टिकणारं आरक्षण या विषयासह मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणावर मुख्यमंत्र्यांनी कोणताही तोडगा न काढल्याने मराठा समन्वयक नाराज झाले. यानंतर पत्रकारांशी बोलताना गेल्या ४० वर्षातील सरकारची री याही सरकारने ओढली असून मुख्यमंत्री मराठा आहेत मात्र त्यांच्या सरकारचा ड्रायव्हर वेगळा आहे ते हतबल आहेत, अशी भूमिका मराठा समन्वयक ऍड. बाबा इंदुलकर यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा समन्वयकांची तातडीची बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तासभर बैठक होऊनही मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाबाबत कोणताही तोडगा निघाला नाही.
Eknath Shinde : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, आंदोलनाची गरज नव्हती, एकनाथ शिंदेंचं भाष्य

जरांगेंशी फोनवर बोलण्याची विनंती केली, मात्र मुख्यमंत्र्यांनी नकार दिला, मराठा समन्वयकांचा आरोप

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मराठा समाजाचे समन्वयक ऍड. बाबा इंदुलकर यांनी मागील ४० वर्षांच्या सरकारची री याही शासनाने ओढली. ओबीसी कोट्यामधून देण्यात येणारं ५० टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाही, मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत मात्र ते हतबल आहेत. त्यांच्या सरकारचा ड्रायव्हर वेगळा आहे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं उपोषण शासनाच्या चुकीमुळे सुरू झालं आहे, जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलण्याची विनंती केली मात्र तीही मुख्यमंत्र्यांनी नाकारल्याचं इंदुलकर यांनी सांगितले.
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय गंभीर, पाणीही गळ्याखाली उतरेना

आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत

कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील समन्वयकांची सुमारे तासभर बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती. मात्र यातून कोणताही तोडगा निघाला नाही. प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना अनेक मराठा समन्वयकांनी एकमेकांविरोधात नाराजी व्यक्त केली, असा प्रकार शासकीय विश्रामगृह येथे दिसून आला. यावेळी योगेश केदार, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, प्रसाद पाटील यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed