• Mon. Nov 25th, 2024
    भास्कर जाधवांना आता घरी बसल्याशिवाय राहणार नाही – निलेश राणे

    रत्नागिरी: भास्कर जाधव तुम्ही आमच्या दैवतावर बोलता हा निलेश राणे तुम्हाला एक दिवस धडा शिकवणार हे लक्षात ठेवा, असा थेट इशाराच निलेश राणे यांनी गुहागर येथे जाहीर सभेत दिला आहे. गुहागर तालुक्यात फक्त पाच ठेकेदार आहेत. सगळी काम मुलाला, जावयाला, पुतण्याला हेच यांचे ठेकेदार आहेत. यांची अनेक बांधकाम बेकायदा अणि गरिबांना वेगळा न्याय या सगळ्याचा हिशेब अधिकार्‍यांना द्यावा लागेल. या संघर्षाची सवय राणे कुटुंबाला आहे, संघर्ष आम्हाला नवीन नाही, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
    भ्रष्टाचार-धरण ते हिंदीमधलं भाषण, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अजितदादांच्या राजकारणाची चिरफाड!
    निलेश राणे पुढे म्हणाले की, भास्कर जाधव या वेळेला तुमचं डिपॉझिट विनय नातू या विधानसभेत जप्त करतील, असा थेट इशाराच निलेश राणे यांनी दिला. कुडाळ मालवण येथे खर्च करणार तेवढा खर्च गुहागरवर करणार. पण भास्कर जाधवांना आता घरी बसल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच राणे यांनी दिला आहे. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष केदार साठे, महिला आघाडीच्या स्मिता जावकर, सुरेखा खेराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    भास्कर जाधव यांचे कोणाशी पटले नाही. आजवर जिल्ह्यात रामदास कदम, उदय सामंत, सुनील तटकरे कोणाशीही यांचे पटले नाही. भास्कर जाधव तुमचा बाजार एक दिवस नाही उठवला ना तर नावाचा निलेश राणे नाही, असा सज्जड इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. ज्या तात्यासाहेब नातूंचा हा मतदारसंघ होता. या मतदारसंघाची भास्कर जाधवांनी वाट लावली. गेल्या पंधरा वर्षात एकही विकास काम हा आणू शकले नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

    Asha Worker Protest : कुपोषित बालकांची सेवा करतो तरी सरकारला कदर नाही; आशा सेविकेनं धक्कादायक अनुभव सांगितला

    बाळासाहेब आमचे दैवत आहेत. आमच्यावर बोलण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे. आता भास्कर जाधव तुम्ही कुठेही सभा घ्या त्या ठिकाणी हा निलेश राणे सभा घेणार लक्षात ठेवा, असा इशारा राणे यांनी दिला आहे. स्वतःला सिद्ध करणारा माणूस अवघ्या महाराष्ट्रात एकच नारायण राणे. बाळासाहेबांचे प्रेम आम्हाला तुम्ही सांगता? असा सवाल करत निलेश राणे यांनी जाधव यांच्यावर टीका केली. तुमची जी चिपळूणची गुंडगिरी निलेश राणे यांनी संपवली होती. आता भाईगिरी आम्हाला नका शिकवू. आम्ही ठाकरे यांना सामोरे गेलो तर तुम्ही कोण आमच्यासमोर?, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. मी कधी काही ठाकरे कुटुंबावर बोललो नाही, असं भास्कर जाधव सांगतात असे सांगत भास्कर जाधव यांनी ठाकरे कुटुंबावर केलेल्या टीकेचा व्हिडिओ राणेंनी जाहीर सभेत दाखवला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed