• Mon. Nov 25th, 2024
    नांदूर मधमेश्वर कालव्याला भगदाड, बेकायदा पाणी घेणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    म. टा. प्रतिनिधी, वैजापूर : तालुक्यातील वक्ती शिवारात बेकायदा पाणी मिळवण्यासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याला भगदाड पाडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी नांदूर मधमेश्वर पाटबंधारे उपविभाग क्रमांक दोनचे कनिष्ठ अभियंता चेतन वाघ यांनी पोलिसात फिर्यादी दिली आहे. त्यावरुन १३ जणांविरुद्ध सिंचन कामांचा बेकायदा वापर करणे व बेकायदा जमाव या आरोपांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे‌.

    संभा अशोक पठारे, दिलीप राधाकिशन पठारे, सचिन पठारे, बालू राधाकिशन पठारे, रामदास पठारे, दत्तू गायकवाड, विजय पठारे, रामदास वाघ, बाबासाहेब हरी, राजू गुडदे, दगडू जाधव, प्रकाश जाधव, गणेश गुडदे, सुभाष गुडघे (सर्व रा. वक्ती) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांनी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते चारच्या दरम्यान साखळी क्रमांक १२१.७८० व साखळी क्रमांक १२२.५३३ वक्ती शिवारात जलदगती कालव्यास मोठा खड्डा पाडून पाणी नाल्यात वळवले आणि पाण्याची नासाडी केली. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळण्यास अडथळा निर्माण झाला असून, हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.
    या चार संस्था BMCकडून विकत घेणार पुनर्प्रक्रिया केलेले पाणी, कुणे अन् किती पाण्यावर होतेय पुनर्प्रक्रिया?
    या प्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जी. आर. थोरात हे करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed