• Thu. Nov 14th, 2024
    दुर्दैवी! क्रिकेट खेळण्यासाठी गेला; मात्र पुन्हा परतलाच नाही, रत्नागिरी तरुणासोबत काय घडलं?

    रत्नागिरी: अलीकडे युवा वर्गामध्ये ही हृदयविकाराच्या झटक्याचे किंवा अन्य ताणतणावामुळे निर्माण होणाऱ्या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक दुर्दैवी घटना चिपळूण तालुक्यात ओंमळी या गावी घडली आहे. क्रिकेट मॅच खेळण्यासाठी गेलेला युवक हा मैदानाबाहेर पडत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला तात्काळ औषध उपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन जात असतानाच त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे.
    धक्कादायक! जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात एसआरपीएफ जवानानं संपवलं जीवन, घटनेनं खळबळ
    मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश दिलीप यादव (३०) राहणार ओंमळी (गोंधळेकर वाडी) असे या मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ११ फेब्रुवारीला नारदखेरकी, जाधववाडी ता. चिपळूण येथे क्रिकेट मॅच असल्याने खेळण्याकरता गेला होता. तो आज दुपारी मैदानातून बाहेर पडत असताना त्याला चक्कर आली. त्यातच उलटी आल्याने डॉ. रसाळ यांच्याकडे उपचाराकरता घेऊन गेले असता डॉ. रसाळ यांनी त्यास तपासून पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर गणेशखिंड मार्गे येत असताना रस्त्यात डॉ. तांबे यांना दाखविले.

    उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत खालावली, वैद्यकीय तपासणीस नकार

    तेथे त्याला जास्त चक्कर येऊ लागल्याने त्याला अधिक उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे घेऊन आले. तेथील डॉक्टरांनी त्याचा ईसीजी काढून तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं. दिनेशच्या मृत्यूमुळे परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. दिनेश हा मुंबई येथे बेस्टच्या निमशासकीय सेवेतील कर्मचारी होता. अलीकडे तो मुंबई येथून गावी आला होता. त्याच्यापेक्षा आई-वडील पत्नी, मुलगी असं कुटुंब आहे या सगळ्या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed